हरियाणाच्या वर्षा बुमराने जिंकला ‘डान्स इंडिया डान्स सुपर मॉम्स’च्या तिसऱ्या पर्वाचा किताब

या तिसऱ्या पर्वाची महाविजेती म्हणून हरियाणाच्या वर्षा बुमराच्या नावाची घोषणा करण्यात आली. वर्षाने आपल्या सोबतच्या सर्व प्रतिस्पर्धींना मागे टाकत प्रेक्षकांसोबतच परीक्षकांनाही आश्चर्याचा धक्का दिला.

हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘डांस इंडिया डांस सुपर मॉम्स’चा नुकताच तिसरे पर्व पार पडले. 25 सप्टेंबर 2022 रोजी या तिसऱ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा संपन्न झाला. यावेळी या तिसऱ्या पर्वाची महाविजेती म्हणून हरियाणाच्या वर्षा बुमराच्या नावाची घोषणा करण्यात आली. वर्षाने आपल्या सोबतच्या सर्व प्रतिस्पर्धींना मागे टाकत प्रेक्षकांसोबतच परीक्षकांनाही आश्चर्याचा धक्का दिला.

‘डांस इंडिया डांस सुपर मॉम्स’च्या तिसऱ्या पर्वाचे परिक्षण कोरियोग्राफर रेमो डिसूजा, अभिनेत्री भाग्यश्री आणि उर्मिला मातोंडकरने केले होते. तसेच जय भानुशालीने कार्यक्रमाचे निवेदन केले होते. या महाअंतिम सोहळ्यात वर्षाला ट्रॉफीसोबतच 7.5 लाखांचे बक्षीस देखील मिळाले.

बक्षीस म्हणून मिळालेल्या पैश्यांवर वर्षाची प्रतिक्रिया

 

View this post on Instagram

 

A post shared by ZEE TV (@zeetv)

वर्षा बुमरा एक रोजंदारींवर काम करणारी महिला आहे, जी दिवसाला 400 ते 500 रूपये कमावायची. रोजगारापासून ते डान्स शोच्या स्टेजपर्यंत पोहोचण्यासाठी वर्षाला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. जेव्हा तिला 7.5 बक्षीस देण्यात आलं. त्यावेळी ती म्हणाली की, “मी कधीही एक लाख रूपये कमवायचे स्वप्न पाहिलं नव्हतं. त्यामुळे सात लाख कमावण खरं वाटत नाही.” तसेच ती पुढे म्हणाली की, या पैशांतून ती तिच्या मुलाला चांगलं शिक्षण देईल आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करेल.

तसेच वर्षा पुढे म्हणाली की, जेव्हा ती डीआईडीच्या मंचावर आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आली होती तेव्हा तिला कर्ज घेतलेल्या सावकारांकडून खूप त्रास होऊ लागला. ती म्हणाली की, “जेव्हा लोकांनी मला कार्यक्रमामध्ये पाहिलं, तेव्हा कर्ज घेतलेले सावकार कर्जाची परत फेड करण्यासाठी त्रास देऊ लागले. त्यावेळी मला रेमो सरांनी मदत केली.


हेही वाचा :

आता फक्त अभिनयच नाही तर ‘या’ चित्रपटाची निर्मिती देखील करणार करिना