सपना चौधरीने केले गुपचूप लग्न, आता चाहत्यांना दिली गुडन्यूज

Haryanvi sensation Sapna Chaudhary blessed with a baby boy, her husband has THIS to say
सपना चौधरीने केले गुपचूप लग्न, आता चाहत्यांना दिली गुडन्यूज

हरयाणाची डान्सर क्विन आणि ‘बिग बॉस ११’ फेम सपना चौधरीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सपना आता आई झाली असून तिला मुलगा झाला आहे. सपनाचा पत्नी वीर साहूने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

आतापर्यंत सपना चौधरीने लग्न आणि प्रेग्नेंसी याबाबत गोष्टी लपवल्या होत्या. पण आता सपनाचे वीर साहूसोबत रिलेशन आणि लग्न केल्याचे समोर आले आहे. परंतु याबाबत तिने कधीच सांगितले नाही आहे. मात्र आता सपना आई झाल्याचे उघडकीस आले आहे. आई होण्याबरोबरच सपना आणि वीर साहूचे लग्न झाले असल्याचे समजले आहे. सपना आई झाल्याचे समजल्यापासून सोशल मीडियावर चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

आज तक वृत्ताच्या माहितीनुसार, हिसार येथे राहणारा वीरने जानेवारीमध्ये सपनासोबत लग्न केले. वीरच्या घरी कोणाचे तरी निधन झाल्यामुळे त्याने सपनासोबत गुपचूप लग्न झाले. सध्या सपना आणि वीरचे कुटुंब छोटा पाहुणा येणार असल्यामुळे खूप खुश आहे.

दरम्यान सोशल मीडियावर सपनाचा नवरा वीर यांच्यावर टीका होत आहे. काही लोकांनी सपना आणि वीरला ट्रोल केले आहे. वीरने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बाबा झाल्याची बातमी दिली आहे. यादरम्यान सपना आणि वीरच्या कुटुबांवर चाहत्यांनी अश्लील प्रतिक्रिया दिल्यामुळे त्याने नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यात कोणाचाही हस्तक्षेप नाही पाहिजे असे वीरने स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांना पब्लिसीटी नाही पाहिजे, असे तो म्हणाला आहे. वीर साहू हा एक सिंगर, परफॉर्मर, अभिनेता आणि निर्माता आहे. गेल्या चार वर्षांपासून सपना सोबत त्याचे रिलेशन होते, आता त्यांनी लग्न केले आहे.

बाहन बेटी मत देखो इस video नै…🙏🏻आज़ एक कलाकार नही एक घरेलू आदमी बोले है जिसे हद्द से ज़्यादा टोरचर किया गया है उसकी पर्सनल लाइफ़ को लेकर..सबकी list है मेरे पै..एक एक का हिसाब होगा..बेशक नाम ना ल्यू …एक एक का बेरा है…कौन म्हारा है और कौन ग़द्दार…यू ट्रेलर है आगै सबका नम्बर है …समझ जाओ

Posted by Veer Sahu on Tuesday, October 6, 2020


हेही वाचा – भाईजानच्या ‘या’ जॅकेटची किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क!