Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Haseen Dillruba Trailer: बेडधडक अन् बोल्ड अवतारातील तापसी २ जुलैपासून दिसणार नेटफ्लिक्सवर

Haseen Dillruba Trailer: बेडधडक अन् बोल्ड अवतारातील तापसी २ जुलैपासून दिसणार नेटफ्लिक्सवर

तापसीच्या सिनेमात कधीच न दिसलेला डोल्ड अवतार प्रेक्षकांना हसीन दिलरुबाच्या निमित्ताने पहायला मिळणार

Related Story

- Advertisement -

तापसी पन्नू (Taapsee pannu) विक्रांत मेस्सी (Vikrant messy) आणि हर्षवर्धन राणे (Harshawardhan rane) यांची जबरदस्त स्टारकास्ट असलेल्या ‘हसीन दिलरुबा’ (Haseen Dillruba) या सिनेमाचा हटके ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. विनिल मैथ्यू दिग्दर्शित हा सिनेमा २ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्म हा सिनेमा पाहता येणार आहे. एक मर्डर मिस्ट्री असलेल्या सिनेमाच्या कहाणीला तिन्ही कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने चार चाँद लावले आहेत. नवविवाहीत तापसी आणि विक्रांत यांच्यापासून सिनेमाची कहाणी सुरु होतेय आणि मध्येच एट्री होते अभिनेता हर्षवर्धन याची आणि सिनेमात सुरु होतो लव ट्रॅगल. ट्रेलर पाहूनच सिनेमा पाहण्याची उत्सुकता वाढत आहे. अनेक चढ उतार आणि जबरदस्त सस्पेंन्स थ्रीलर पहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)


अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या हटके आणि बिनधास्त स्वभावामुळे कायमच चर्चेत असते. हसीन दिलरुबा या सिनेमातून तापसीचा बोल्ड लुक प्रेक्षकांच्या समोर आला आहे. याआधीच्या तापसीच्या सिनेमात कधीच न दिसलेला डोल्ड अवतार प्रेक्षकांना हसीन दिलरुबाच्या निमित्ताने पहायला मिळणार आहे. ‘एक राजा था,एक राणी थी,हुई शुरु एक खून प्रेम कहानी’, असे म्हणत अभिनेत्री तापसी पन्नू हिने सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहून चाहत्यांनी सर्व कलाकारांचे कौतुक केले आहे. ट्रेलरने सिनेमा पाहण्याची उत्सुकता आणखी वाढवली आहे. सिनेमात ऋषी आणि राणी ही पात्र अभिनेत्री तापसी आणि विक्रांत साकारत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

- Advertisement -

‘ये इश्क़ भी बड़ा नापाक है , आज साथ तो कल ख़िलाफ़ है’, असे म्हणत याआधीही तापसीने सिनेमातील तिची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली होती. सिनेमात अनेक लव्ह मेकिंग सीन्स दाखवण्यात आलेत. सिनेमाची थ्रीलर स्टोरी नक्की काय असणार हे पाहण्यासाठी २ जुलै पर्यंत प्रेक्षकांना वाट पहावी लागणार आहे. हा सिनेमा सप्टेंबर २०२०२मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना महामारी आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सिनेमा पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे आता सिनेमा थिएटर ऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


- Advertisement -

हेही वाचा – Drug Case: सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीने लग्न करण्यासाठी केला जामीन अर्ज

- Advertisement -