गेल्या महिन्यात 20 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित झालेला ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. या चित्रपटातून अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर स्क्रीन शेअर केली. त्यांची ही नवीकोरी फ्रेश जोडी प्रेक्षकांना भावली आणि त्यामुळे चित्रपटाला चांगला प्रतिसाद लाभला. अशा या नव्या जोडीचं एक भन्नाट कँडिड फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सुबोध आणि तेजश्रीचा निखळ अंदाज लक्ष वेधून घेतोय.
हॅशटॅग जोडी ट्रेंडिंगवर
अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री तेजश्री प्रधानचं सोशल मीडियावर एक फोटोशूट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तेजश्रीने पेस्टल हिरव्या रंगाचा कुर्ता आणि पांढरी पॅन्ट परिधान केली आहे. तर अभिनेता सुबोध भावेने केशरी रंगाचे स्ट्राइप्स शर्ट आणि डेनिम जीन्स परिधान केली आहे. हे फोटो आनंद दिलीप गोखले लिखित, दिग्दर्शित ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान क्लिक केलेले आहेत. प्रसिद्ध फोटोग्राफर शशांक सानेने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. ज्यावर नेटकऱ्यांच्या बऱ्याच कमेंट्स येताना दिसत आहेत.
View this post on Instagram
‘हॅशटॅग तदेव लग्नम’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली आहे. एक साधी, सोपी आणि सुटसुटीत गोष्ट जी फॅमिलीसोबत पाहणं अगदीच शक्य आहे असा हा सिनेमा आहे. या व्हायरल फोटोशूटवर सर्वाधिक लोकांनी तेजश्री प्रधानला ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका का सोडलीस? अशी विचारणा केली आहे. तर काहींनी तेजश्रीने मालिकेत परत यावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिने आजवर विविध मालिका तसेच मराठी आणि हिंदी चित्रपट केले आहेत. ‘होणार सून मी ह्या घरची’ आणि ‘अगंबाई सासूबाई’ या मालिकांमध्ये तिने साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांकडून विशेष प्रेम मिळाले. नुकतीच तिने स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. या मालिकेत ती मुक्ता हे मध्यवर्ती पात्र साकारत होती. येत्या काळात तिचे ‘असा मी अशी मी’, ‘दर्मियाँ’ आणि ‘सोलमेट’ हे सिनेमे येऊ घातले आहेत.
अभिनेता सुबोध भावेनेदेखील विविध मालिका तसेच चित्रपटांमधून आपली विशेष छाप सोडली आहे. येत्या काळात त्याचा ‘संगीत मानापमान’ हा चित्रपट येणार आहे. ज्याची उत्सुकता आतापासूनच प्रेक्षकांमध्ये दिसून येत आहे.
हेही पाहा –