Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन 'फकाट'च्या निमित्ताने सुयोग गोऱ्हे , रसिका सुनीलची 'हॅट्रिक'

‘फकाट’च्या निमित्ताने सुयोग गोऱ्हे , रसिका सुनीलची ‘हॅट्रिक’

Subscribe

सध्या ‘फकाट’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुयोग गोऱ्हे आणि रसिका सुनील ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वीही सुयोग आणि रसिकाने चित्रपटात आणि मालिकेमध्ये एकत्र काम केले आहे. त्यामुळे आता ‘फकाट’च्या निमित्ताने त्यांची हॅट्रिक होणार आहे. मुळात रसिका आणि सुयोगची पडद्यामागेही घनिष्ट मैत्री असल्याने पडद्यावरही त्यांची केमिस्ट्री तितकीच अफलातून वाटते. त्यांची हीच केमिस्ट्री प्रेक्षकांना येत्या २ जून रोजी पाहायला मिळणार आहे.

आपल्या या मैत्रीबद्दल सुयोग गोऱ्हे म्हणतो, ” आम्ही खूप चांगले मित्र आहोत. एकमेकांसोबत यापूर्वीही काम केल्याने आमच्यात एक कम्फर्ट झोन निर्माण झाला आहे. आम्ही खूप धमाल करतो. कधी एकमेकांना कामाबद्दल सल्लेही देतो. मुळात इतक्या वर्षांची मैत्री असल्याने आता आम्हाला एकमेकांचे स्वभाव माहित झाले आहेत. कोणत्या परिस्थितीत एकमेकांची रिऍक्शन कशी असेल, याचीही आम्हाला आता कल्पना असते. आम्ही भांडणेही तितकीच करतो.” तर रसिका या मैत्रीबद्दल म्हणते, ”आमच्या सुरुवातीच्या काळात आम्ही घरही शेअर केले असल्याने एकमेकांची मेहनत, संघर्ष पाहिला आहे. सुयोगला जर एखादा चांगला प्रोजेक्ट मिळाला तर त्याचा आनंद सुयोगपेक्षाही मला जास्त होतो. कधी कधी आम्ही वायफळ गप्पा मारत असलो तरी कामाबद्दलची आमची तितकीच चर्चा होते. सुयोग मित्र म्हणून तर बेस्ट आहेच शिवाय एक अभिनेता म्हणूनही तो तितकाच प्रतिभाशाली आहे. सेटवर तो त्याच्या व्यक्तीरेखेचा गांभीर्याने अभ्यास करतो.”

- Advertisement -

वक्रतुंड एंटरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओज प्रस्तुत, नीता जाधव निर्मित, श्रेयश जाधव दिग्दर्शित ‘फकाट’ या चित्रपटात हेमंत ढोमे, अनुजा साठे, अविनाश नारकर, नितीश चव्हाण, महेश जाधव, किरण गायकवाड आणि कबीर दुहान सिंग यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.


हेही वाचा :

सोनाक्षी सिन्हाने मुंबईत खरेदी केला सी-फेसिंग फ्लॅट

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -