Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन विरोध करणाऱ्यांनी रावण कधी पाहिलाय का? असं म्हणत मनसेचा 'आदिपुरुष' चित्रपटाला पाठिंबा

विरोध करणाऱ्यांनी रावण कधी पाहिलाय का? असं म्हणत मनसेचा ‘आदिपुरुष’ चित्रपटाला पाठिंबा

Subscribe

मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत (director om raut) याच्या ‘आदिपुरुष’ (adipurush movie) चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा टिझर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटातील व्हीएफक्स आणि सैफ अली खानने साकारलेल्या ‘रावणा’च्या भूमिकेवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. त्याच सोबत भाजप आमदार राम कदम यांनी ‘महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशाराच दिला आहे. या सगळ्यात मनसेने मात्र दिग्दर्शक ओम राऊत यांना पाठिंबा दर्शविला आहे आणि या सगळ्यावर आपली जाहीर भूमिका मंडली आहे.

हे ही वाचा – ‘आदिपुरुष’ चित्रपटाला राजकीय वर्तुळातूनही विरोध; राम कदमांनी ट्विट करत दिला इशारा

- Advertisement -

दरम्यान या सगळ्यावर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर( amey khopkar) यांनी ट्विट करत ‘महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचा ‘आदिपुरुष’ या चित्रपटाला पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर ‘आदिपुरुष’ चित्रपटावर होणार टीका ही दुर्दैवी आहे असंही अमेय खोपकर म्हणाले”.

”सिनेमा कळत असेल तर राम कदमांनी सिनेमा काढावा. राम कदम चित्रपट न पाहता खासी काय भूमिका घेऊ शकतात असा सवाल सुद्धा अमेय खोपकर यांनी उपस्थित केला. मी हा चित्रपट पाहणार असून आमचा या चित्रपटला पूर्ण पाठिंबा आहे”. असं अमेय खोपकर एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हणाले.

- Advertisement -

अमेय खोपकर ट्विट मध्ये काय म्हणाले?

”ओम राऊत या दिग्दर्शकाने यापूर्वी लोकमान्य आणि तान्हाजी या कलाकृतींमधून इतिहासाची अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ओम राऊत यांनी साकारलेला भव्य लाईट ॲंड साऊंड शो आजही दिमाखात सुरु आहे”.

”ओम राऊत याच्या आगामी ‘आदिपुरुष’ टीझरवरुन टीका होणं हे दुर्दैवी आहे. ओम राऊत आणि सहकाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची प्रचीती चित्रपट प्रदर्शित झाल्यावर येईल अशी आम्हाला खात्री आहे. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचा ‘आदिपुरुष’ निर्मितीला पूर्ण पाठिंबा आहे”. असंही अमेय खोपकर यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा – दिल्लीतील रामलीलेमध्ये प्रभासने केलं रावण दहन; व्हिडीओ व्हायरल 

 

 

 

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -