‘Pushpa’ सिनेमाचे हिंदी व्हर्जन पाहिलात का? इथे झालाय रिलीज

अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदाना यांचा 'पुष्पा द राइज' या चित्रपटाने धुमाकुळ घातला आहे. या चित्रपटाने मोठ्या प्रमाणात कमाई केली असून आतापर्यंत, 326 कोटींचा बिजनेस केला आहे. या चित्रपटाला इतकी पसंती मिळाली आहे की, हा चित्रपट तेलुगू मध्ये रिलीज झाला असून, या सिनेमाचे अनेक भाषांमध्ये डबींग करण्यात आले आहे.

Have you seen the Hindi version of 'Pushpa' movie? Released here
'Pushpa' सिनेमाचे हिंदी व्हर्जन पाहिलात का? इथे झालाय रिलीज

अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदाना यांचा ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने मोठ्या प्रमाणात कमाई केलीअसून आतापर्यंत 326 कोटींचा बिजनेस केला आहे. या चित्रपटाला इतकी पसंती मिळाली आहे की, हा चित्रपट तेलुगू मध्ये रिलीज झाला असून, या सिनेमाचे अनेक भाषांमध्ये डबींग करण्यात आले आहे. हा सिनेमा मल्याळम, तमिळ,कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये डब करण्यात आला आहे. साऊथमध्ये या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी आता या सिनेमाचे हिंदी व्हर्जनसुद्धा रिलीज करण्यात आले आहे. ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. जाणून घ्या,कुठे रिलीज झाले ‘पुष्पा द राइस’ चित्रपटाचे हिंदी व्हर्जन.

 

View this post on Instagram

 

A post shared by amazon prime video IN (@primevideoin)

 

अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज झाला सिनेमा

‘पुष्पा द राइज’ या सिनेमाचे हिंदी व्हर्जन ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. शुक्रवारी रात्री 12 वाजता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. याशिवाय सिनेमासोबत असे कॅप्शन दिले आहे की, ‘हा एक सिनेमा नाही तर चिंगारी आहे’अॅमेझॉन प्राइमने रात्रीच्या वेळेस सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. चाहत्यांनी अल्लू अर्जुनला पाहून बरीच तारीफ केली आहे. हा चित्रपट हिंदी चित्रपट बाजारामध्ये लाखोंची कमाई करणारा चित्रपट ठरला. हा चित्रपट आंध्रप्रदेशातील डोंगराळ भागात सुरु असलेल्या लाल चंदनाच्या तस्करीवर आधारीत आहे.

‘पुष्पा द राइज’ हा पुष्पा सिनेमाचा पहिला भाग आहे. 2022 मध्ये या सिनेमाचा दुसरा पार्टसुद्धा प्रदर्शित होणार आहे. अल्लू आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबतच फहाद फासिलनेदेखील या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.


हेही वाचा – Kiran Mane : इंदिरा गांधींवर टीका करायचो, पण तेव्हा अशी दहशत नव्हती, किरण मानेंचा संताप