प्रियंकाची थ्रिलर वेबसीरिज ‘सिटाडेल’चा ट्रेलर पाहिलात का?

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूडनंतर आता हॉलिवूडमध्येही चांगली ओळख निर्माण केली आहे. सध्या ती तिच्या ‘सिटाडेल’ या वेबसीरीजमुळे चर्चेत आहे. प्रियांकाची ‘सिटाडेल’ ही थ्रिलर वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या वेबसीरीजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 2 मिनट 16 सेकंदाच्या या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

अॅमेझॉन प्राईमवर प्रियांकाची हॉलिवूड वेब सीरिज ‘सिटाडेल’ प्रेक्षकांना बघता येणार आहे. ‘सिटाडेल’ सीरिजचे पहिले दोन एपिसोड पुढील महिन्यात 28 एप्रिलला प्रदर्शित केले जाणार आहेत, तर उर्वरीत एपिसोड 26 मेपासून प्रदर्शित केले जातील. ‘सिटाडेल’चा २ मिनट १६ सेकंदाचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक या सीरीजची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

‘सिटाडेल’च्या ट्रेलरमध्ये प्रियांका चोप्राचा या वेब सीरिजमध्ये नादिया सिंह ही भूमिका साकरत असून ती एका गुप्तहेराच्या भूमिकते दिसणार आहे. या वेब सीरिजमधील प्रियांकाने तिच्या डायलॉग्सचे डबिंग स्वत: केले आहे. ‘प्रियांकाच्या या हॉलिवूड वेब सीरिजची भारतात देखील क्रेझ आहे. तिचे भारतातील चाहते या सीरिजची उत्सुकतेने वाट बघत आहेत. ‘सिटाडेल’ वेब सीरिजमध्ये अभिनेता रिचर्ड मॅडेन हा मेसन केन ही भूमिका साकारणार आहे, तर स्टेनली टुकी हा बर्नार्ड ऑरलिक तसेच यामध्ये अभिनेत्री लेस्ली मैनविल ही डाहलिया आर्चर या भूमिकेत दिसणार आहे.

‘सिटाडेल’ या वेब सीरिजची निर्मिती रुसो ब्रदर्स यांच्या AGBO या कंपनीने आणि शो रनर डेविड वेइल यांनी केली आहे. ही सीरिज जगभरातील 240 हून अधिक देशांमध्ये एकत्र प्रदर्शित होणार आहे. ‘सिटाडेल’ या वेब सीरिजची निर्मिती 236 मिलियन डॉलरमध्ये करण्यात आली आहे. ही वेबसीरीज भारातत हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘सिटाडेल’ वेब सीरिजनंतर प्रियांका चोप्रा चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती ‘लव्ह अगेन’ या रोमॅंटिक चित्रपटात ह्यूगन आणि सेलीन डायोनसोबत काम करणार आहे, तर फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या सिनेमात ती कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.