Lata Mangeshkar लवकर बऱ्या व्हाव्यात म्हणून अयोध्येत पूजाअर्चा, होम हवन

लता मंगेशकर यांना ८ जानेवारी रोजी कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लता दीदी रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्यांच्याविषयी अनेक अफवा पसरवण्यात आल्यात. लता मंगेशकर यांना अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन लती दीदींच्या प्रकृतीबाबत अशा प्रकारच्या अफवा न पसरवण्याची विनंती केली होती.

Lata Mangeshkar latest Health Update doctor's information Latadidi response to treatment under icu
Lata Mangeshkar Health Update : लतादीदींचा उपचारांना प्रतिसाद, डॉक्टरांची माहिती

सर्वाच्या लाडक्या गायिका गानसम्राज्ञी लता मंगेशकर ( Lata Mangeshkar ) या गेल्या महिनाभरापासून मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital)  आहेत. लता दीदींची प्रकृती ठीक व्हावी म्हणून डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करत असून त्यांना सर्वांच्या आशिर्वादाची आणि प्रार्थनेची गरज  आहे.  अनेकांनी लती दीदींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अयोद्धेत लता मंगेशकरांसाठी महामृत्युंजय जप आणि हवन केले जात आहे. लती दीदींसाठी आयोजित केलेल्या पवित्र अनुष्ठानात सहभागी होणारे जगद्दुरू परमहंस आचार्य महाराज यांनी म्हटले आहे की, गायिका लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्या लवकर घरी परताव्या यासाठी आम्ही महामृत्युंज म्हणत आहोत. लवकरच मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लता दीदींना भेटण्याची विनंती करणार आहे.

लता मंगेशकर यांना ८ जानेवारी रोजी कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लता दीदी रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्यांच्याविषयी अनेक अफवा पसरवण्यात आल्यात. लता मंगेशकर यांना अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन लती दीदींच्या प्रकृतीबाबत अशा प्रकारच्या अफवा न पसरवण्याची विनंती केली होती. लता दीदींच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांच्या वयामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. दीदींबाबत कोणत्याही अफवा पसरवू नका आणि अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका असे त्यांनी म्हटले होते.

ब्रीच कँडी रुग्णालयात डॉ. प्रतीत समदानी यांच्या अंतर्गत लता दीदींवर उपचार सुरू आहेत. त्यांची संपूर्ण टीम लता दीदींवर सतत लक्ष ठेवून असतात. त्यांच्या प्रकृतीबाबत रोज अपडेट देणे. काही माहिती गोपनीय ठेवणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या तब्येतीबाबत अफवा, प्रकृती स्थिर