घरमनोरंजनHBD: तब्बल 14 वर्षांनी 'दबंग' सिनेमानंतर बदलले अरबाज खानचे आयुष्य

HBD: तब्बल 14 वर्षांनी ‘दबंग’ सिनेमानंतर बदलले अरबाज खानचे आयुष्य

Subscribe

अरबाजने अभिनय क्षेत्रात काही दमदार कामगीरी केली नसली तरी एक निर्माता आणि दिग्दर्शकाच्या रुपात अरबाजने आपली ओळख निर्माण केली आहे.

 

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आज त्याच्या 54 वां वाढदिवस साजरा करत आहे. अरबाजने अभिनय क्षेत्रात काही दमदार कामगीरी केली नसली तरी एक निर्माता आणि दिग्दर्शकाच्या रुपात अरबाजने आपली ओळख निर्माण केली आहे. ‘दरार’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या अरबाज खानने निगेटीव्ह आणि सपोर्टींग रोलमध्ये उत्तम अभिनय करुन लोकांची मने जिंकली. अरबाजचा ‘प्यार किया तो डरना क्या’ हा सिनेमा हिट ठरला होता. व्यवसायिक क्षेत्रासोबतच अरबाज व्यक्तीगत आयुष्यातील अनेक घडामोडीमुळे सतत लाईम लाईटमध्ये असतो. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

- Advertisement -

भाऊ-बहिणीचे अतूट नाते

अरबाजने अनेक सिनेमात कामं केली पण त्याला त्याच्या भावप्रमाणेच म्हणजेच सलमान खान सारखं स्टारडम मिळालं नाही.पण संपुर्ण खान फॅमिलीमध्ये तसेच भाऊ-बहिणीत अतूट प्रेम आहे. सलमान खानच्या दबंग या प्रसिद्ध सिनेमात अरबाजने केलेल्या कामगिरीबद्दल अनेकांनी त्याच कौतूक केलं. तसेच यानंतर अरबाजने स्वत:च्या प्रोडक्शन हाउसची स्थापना केली. अरबाज खान प्रोडक्शन अंतर्गत ‘दबंग 2’ सिनेमा तयार करण्यात आला तसेच प्रेक्षकांनी यालासु्द्धा भरभरुन प्रतिसाद दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial)

- Advertisement -

मलायका सोबत घटस्फोट

अरबाजने 12 डिसेंबर 1998 मध्ये मलायका अरोरा सोबत लग्नगाठ बांधली होती. त्याची ओळख एका कॉफीच्या जाहीरातीदरम्यान झाली होती. आपल्या पुर्व पत्नी मलायका अरोरा सोबत अरबाजने ‘पॉवर कपल’ शो मध्ये सहभाग घेतला होता. पण 2017 व्यक्तीगत करणांमुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता अरबाज जॉर्जिया एंड्रियानी हिला डेट करत आहे.तर मालायका अर्जून कपूर सोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial)


हे हि वाचा – शाहरुख खानचा शर्टलेस हॉट अंदाज सोशल मीडियावर होतोय व्हायरल

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -