Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन HBD:वयाच्या 15 व्या वर्षी सोनम कपुरने केली होती वेट्रेसची नोकरी

HBD:वयाच्या 15 व्या वर्षी सोनम कपुरने केली होती वेट्रेसची नोकरी

सोनमने 2007 साली संजय लीला भन्साली यांच्या सिनेमातून 'सांवरीया' या फील्म मधून डेब्यू केला होता.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टारने सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्याआधी वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी केली आहे. इतकेच नाही तर फिल्मीजगातील मोठ्या कुटुंबात जन्म घेतल्यानंतरही त्यांनी व्यक्तीगत प्रवासाची सुरुवात कुठेना कुठे नोकरी करूनच केली आहे. यामधीलच एक महत्वपूर्ण कलाकारांमध्ये अभिनेत्री सोनम कपूरचे नाव जोडले जाते. सोनम बॉलिवूड मधील कपूर घरण्यातील महत्वपूर्ण सदस्य आहे. दिगज्ज सदाबहार अभिनेता अनिल कपूरची मुलगी आहे. सोनम एक यशस्वी अभिनेत्री आहे. आणि आज म्हणजेच 9 जून रोजी सोनम कपूर तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. या दिवसानिमित्त सोनम कपूर बद्दल काही खास माहिती जाणून घेऊया.

केली होती वेट्रेसची नोकरी

सोनमने बॉलिवूड मध्ये एंट्री करण्याआधी कोणत्याही मोठ्या कंपनीत नाही तर एका रेस्ट्रोरेंटमध्ये नोकरी करत होती. सोनमने वेट्रेसची नोकरी केली होती. आपल्या इतर गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच पॉकेटमनीत भर पडावी म्हणून सोनमने वयाच्या 15 व्या वर्षी एका रेस्ट्रोरेंट मध्ये काम करायची. पण तिने 1 आठवड्या नंतर काम सोडून दिले.

बॉयफ्रेंडने उडवली होती खिल्ली
- Advertisement -

सोनम कपूरला बॉलिवूडमधील फॅशनिस्टा म्हणून संबोधले जाते. पण एकेकाळी सोनम खूप लठ्ठ होती. तिच्या वजनावरून अनेकांनी खिल्ली उडवली होती. एका मुलाखती दरम्यान सोनमने संगितले होते . जेव्हा सोनम 15 ते 20 वर्षाची असताना तिला PCOC च्या आजाराचा सामना करावा लागला होता. आणि यामुळे तिचे वजन जलद गतीने वाढत होते. याचदरम्यान वजनावरून सोनमच्या बॉयफ्रेंडने तिला चिढवले आणि अपमान केला यानंतर तिने त्याच्या सोबत न राहण्याचा निर्णय घेतला होता.

सोनममुळे अर्जुनला खावा लागला मार

सोनम आणि अर्जुन हे दोघेही चुलत भाऊ बहीण आहेत. आणि त्यांचे शिक्षन एकाच शाळेत झाले आहे. जेव्हा सोनमचे शाळेत कोणासोबत भांडण होत असे तेव्हा सोनम अर्जुनला सोबत घेऊन जात असे. आणि एके दिवस एका सीनियर मुलाने सोनम कडून बॉल हिसकावून घेतला होता आणि सवयीप्रमाणे ती रडत अर्जुनकडे गेली असता अर्जुनने त्या मुलासोबत लढाई करण्यास गेला असता स्वत: मार खाऊन आला कारण समोरील मुलगा एक बॉक्सिंग चॅम्पियन होता. एका मुलाखती दरम्यान अर्जुनने खुलासा केला होता.

सोनम कपूरला अभिनेत्री बनायचे नव्हते
- Advertisement -

सोनम कपूरला अभिनेत्री बनायचे नव्हते तर तिला एक लेखक आणि दिग्दर्शक बनण्याचे स्वप्न होते. सोनमने 2007 साली संजय लीला भन्साली यांच्या सिनेमातून ‘सांवरीया’ या फील्म मधून डेब्यू केला होता. तसेच 2005 मध्ये राणी मुखर्जीच्या ‘ब्लॅक’सिनेमात तिने असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केले होते.


हे हि वाचा – ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेवर LGBTQIA+ कम्युनिटीने घेतला आक्षेप

- Advertisement -