घरताज्या घडामोडीHBD Dhanush: अक्षय कुमार अन् साराने दिल्या अतरंगी मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

HBD Dhanush: अक्षय कुमार अन् साराने दिल्या अतरंगी मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Subscribe

तुला आयुष्यात पॉझिटिव्हिटी आणि शांती मिळो. त्याचप्रमाणे स्निकर्स, पनीर, सोडा,पुस्तके, कर्नाटकीय संगीतही मिळो', असे साराने म्हटले आहे.

साऊथ सुपरस्टार धनुषचा (Dhanush)  आज त्याचा ३८वा वाढदिवस साजरा करत आहे. धनुषच्या वाढदिवसाला त्याच्या सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पडला आहे. धनुष येत्या काळात ‘अतरंगी रे’ (Atarangi re) या सिनेमात दिसणार आहे. धनुषसोबत या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार (Alshay Kumar) आणि अभिनेत्री सारा अली खान (Saara Ali khan) असणार आहेत. सारा आणि अक्षय यांनी धनुषच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे सिनेमातील पडद्यामागचे काही फोटो शेअर करत त्याला सिनेमाच्या नावाप्रमाणे अतरंगी शुभेच्छा दिल्या आहेत. (HBD Dhanush: Akshay Kumar and saara ali khan wishes to close friend dhanush)

धनुषसोबतचा सिनेमाच्या सेटवरचा एक फोटो शेअर करत सारा लिहिले आहे की,  ‘धनुष वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. तुला आयुष्यात पॉझिटिव्हिटी आणि शांती मिळो. त्याचप्रमाणे स्निकर्स, पनीर, सोडा,पुस्तके, कर्नाटकीय संगीतही मिळो’, असे साराने म्हटले आहे. या फोटोमध्ये सारा आणि धनुषने हिवाळ्यातील कपडे घातले आहेत. धनुष हिरवा स्वेटर आणि डेनिममध्ये दिसत आहे.

- Advertisement -

अभिनेता अक्षय कुमारने देखील त्यांच्या फोटोशूटमधील एक फोटो शेअर करत धनुषला झक्कास शुभेच्छा दिल्या आहेत. ‘तुझे नाव धनुष आहे पण तुझे नाव तीर असते तरी योग्य ठरले असते. तुझ्या प्रतिभेसाखा तु आनंदी आहेस. वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा धनुष. नेहमी चमकत राहा’, असे म्हणत धनुषने तिघांचा क्यूट फोटो शेअर केला आहे.

- Advertisement -

 

 

अतरंगी रे या सिनेमात अभिनेत्री सारा अली खान प्रमुख नायिकेच्या भुमिकेत असणार आहेत. सारा आणि धनुष यांना प्रेक्षक पहिल्यांदा अतरंगी रे या सिनेमातून एकत्र काम करताना पाहणार आहेत. हा सिनेमा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान यांची अतरंगी जोडी सिनेमात काय अतरंगीपणा करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.


हेही वाचा – HBD: सुपरस्टार धनुष आहे खुप मोठा शिवभक्त,दररोज करतो शंकराची उपासना

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -