Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन HBD:डिंपल कपाडिया यांनी लग्नानंतर घेतला होता10 वर्षाचा ब्रेक

HBD:डिंपल कपाडिया यांनी लग्नानंतर घेतला होता10 वर्षाचा ब्रेक

1993 मध्ये रिलीज झालेला चित्रपट 'रुदाली' हा डिंपल कपाडिया यांच्यासाठी म्हत्वपूर्ण ठरला होता

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड म्हटलं की झगमगती चंदेरी दुनिया समोर उभी राहते. अनेक बडे स्टार त्यांची स्टारडम पाहून चाहते एकदम प्रभावित होतात. पण कलाकारांना देखील इथवर पोहोचण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. भले तो कोणत्याही बड्या स्टारचा मुलगा असो किंवा सामान्य व्यक्ती बॉलिवूडमध्ये प्रेक्षकांचा कौल देखील तितकाच महत्वाचा असतो. अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी देखील बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण करण्यासाठी अनेक खस्ता खाल्ल्या आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि या खास दिवसानिमित्त त्यांच्या फिल्मी करियरची सुरुवात कशी झाली हे जाणून घेऊया.

बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा जन्म 8 जून 1957 मध्ये मुंबईतील गुजारती कुटुंबात झाला. वडील चुन्नीभाई कपाडिया एक उद्योजक होते. डिंपल कपाडिया यांची रुचि नेहमीच अभिनयात होती. आणि याच कारणास्तव त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षीच अभिनय करायला सुरुवात केली. अभिनेता राज कपूर यांनी डिंपल यांना सिनेमात पहिली वाहिली संधि दिली होती. 1973 साली ‘बॉबी’ या सिनेमातून डिंपल यांनी सिनेमात पदार्पण केले. तसेच अभिनेता ऋषि कपूर यांनी देखील याच सिनेमातून पहिल्यांदा बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. आणि पाहिल्याच सिनेमात दोघांनी कमाल करून टाकली. दोघेही रुपेरी पडद्यावर चांगलेच रंगले होते. तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेयर पुरसकर देखील मिळाला होता . पण यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतून जवळ जवळ 11 वर्षचा ब्रेक घेतला. एवढा मोठा ब्रेक घेण्याचे कारण म्हणजे त्या काळचे सुपरस्टार अभिनेता राजेश खन्ना हे होते. ‘बॉबी’ सिनेमानंतर राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडिया सोबत विवाह केला होता. दोघांच्याही वयात खूप अंतर होते. राजेश खन्ना डिंपलपेक्षा वयाने दुप्पट मोठे होते. राजेश आणि डिंपल ययांच्या लग्नातीत एक लहानशी व्हिडिओ क्लिप त्यावेळेस सर्व सिनेमा गृहात सिनेमा सुरू होण्याआधी दाखवली गेली होती.

- Advertisement -

मोठ्या ब्रेक दरम्यान डिंपल यांना ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना या दोन अपत्यांना  जन्म दिला होता. काही दिवसातच राजेश खन्ना आणि डिंपल यांच्यामधील नाते बिघडू लागले होते. दोघेही काही काळाने वेगळे झाले. पण त्यांनी घटस्फोट घेतला नाही. पण राजेश खन्ना यांच्या आयुष्यातील शेवटच्या काळात डिंपल यांनी त्यांची साथ सोडली नाही ते शेवट पर्यंत एकत्र राहिले होते.
बॉबी सिनेमा नंतर डिंपल कपाड़िया यांनी जख्मी शेर, एतबार, सागर, आखिरी अदालत, नरसिमाह, अजूबा, राम लखन, कॉकटेल,अंग्रेजी मीडियम सारखे अनेक सिनेमात काम केलं. 1993 मध्ये रिलीज झालेला चित्रपट ‘रुदाली’ हा डिंपल कपाडिया यांच्यासाठी म्हत्वपूर्ण ठरला होता


हे हि वाचा – रियाने ठरली बॉलिवूडची सर्वात प्रभावी अभिनेत्री, दीपिका-कतरिनाला टाकलं मागे

- Advertisement -