HBD: चार लाख रुपये घेऊन मुंबईत आली होती कतरीना कैफ, आज आहे कोट्याधीश

वेबसाईटच्या माहितीनुसार कतरीनाजवळ एकूण 224 कोटी रुपये संपत्ति आहे

HBD: Katrina Kaif came to Mumbai with Rs 4 lakh, today she is a billionaire
HBD: चार लाख रुपये घेऊन मुंबईत आली होती कतरीना कैफ, आज आहे कोट्याधीश

बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफने (Katrina Kaif)अगदी कमी वेळात आपल्या अभिनय कौशल्येच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सध्या कतरीनाची गणना इंडस्ट्रीमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत करण्यात येते. इतकचं नाही तर कतरीना तब्बल पाच वेळा World Sexiest Woman ठरली आहे. तसेच 2011 साली कतरीनाला जगातील सर्वात सुंदर महिलेचा पुरस्कार मिळाला होता अणि चार वेळा कतरीनाला आशिया खंडातील Asian Sexiest Woman म्हणून गौरवण्या आलं आहे. पण कतरीनाचा हा प्रवास म्हणावा तितका सोपा नव्हता. कतरीनाने याकरिता प्रचंड मेहनत घेतल्याचे पाहायला मिळते. कतरीना कैफ आज, (१६ जुलै) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमीत्त तिचा बॉलिवूडमधील प्रवास कसा होता हे पाहूयात. कतरीना जेव्हा आपल्या बहिणी सोबत मुंबईमध्ये दाखल झाली होती तेव्हा तिच्या जवळ 4 लाख रुपये होते. काही दिवसांनी तिची बहिण क्रिस्टीन परदेशात निघून गेली. पण कतरीनाने फिल्म इंडस्ट्रीमध्येच करियर बणवण्याचा इरादा पक्का केला होता. (HBD: Katrina Kaif came to Mumbai with Rs 4 lakh today she is a billionaire)

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

2003 साली कतरीनाने ‘बूम’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. आणि हा सिनेमा सुपर फ्लॉप झाला होता. यानंतर 2007 मध्ये अभिनेता अक्षय कुमार सोबत ‘नमस्ते लंडन’ सिनेमात काम केल्यानंतर कतरीनाला यश प्राप्त झाले .फोर्ब्स या प्रसिद्ध मॅगजीनच्या अनुशंगाने 2019 मध्ये कतरीना कैफ 100 Highest paid celebrities च्या यादीत 23व्या क्रमांकावर आली होती. तसेच 2017 पासून कतरीनाचा फोर्ब्सच्या यादीत समावेश होत आहे. कतरीना दरवर्षी तब्बल 23.64 करोड़ रुपए कमावते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कतरीना आज मुंबईसह परदेशातील अनेक प्रॉपर्टीची मालकीण आहे. कतरीनाकडे बांद्रामध्ये 8 कोटीच्या एकअपार्टमेंट, एक पेंटहाउस, लोखंडवाला मध्ये 17 कोटींचा अपार्टमेंट आहे. तसेच लंडनमध्ये 7 कोटी रुपयांचा एक बंगला आहे.

एका वेबसाईटच्या माहितीनुसार कतरीनाजवळ एकूण 224 कोटी रुपये संपत्ति आहे. एका ब्रांड एंडोर्समेंट साठी कतरीना 6-7 कोटी रुपये आकारते.तसेच एका सिनेमासाठी कतरीना 11 कोटी रुपये मानधन घेते.हे हि वाचा – ‘वॅक्सिन परदेशात मात्र अभिनय भारतात’, परिणीती चोप्रावर उठली टीकेची झोड