Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन HBD: बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यापूर्वी कियारा अडवाणीने बदलले होतं स्वत:चं नाव,जाणून घ्या खरे...

HBD: बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यापूर्वी कियारा अडवाणीने बदलले होतं स्वत:चं नाव,जाणून घ्या खरे कारण

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने आपल्या अभिनय कौशल्येच्या जोरावर रसिक प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. नुकतच कियाराचा ‘शेरशाह’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कियाराने नेहमीच वेगवेळ्या धाटणीच्या भूमिका साकारण्याचा प्रर्यत्न केला आहे. तिचा बॉलिवूडमधील प्रवास म्हणावा तितका सोप्पा नव्हता. कियारासाठी आजचा दिवस खास आहे. कियारा तिचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्त कियाराच्या आयुष्यातील काही खास गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. कियाराचा जन्म मुंबईमध्ये झाला आहे. तसेच तिच्या आजीने तिला शिक्षण क्षेत्रात करियर करण्यासाठी मार्गदर्शन केले होते. तिला शिक्षक बणण्याचा सल्ला दिला होता. सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापुर्वी कियाराने टिचर म्हणून काम केलं होतं. तसेच कियाराचं खरं नाव आलिया आहे हे फार कमी लोकांनाच ठाऊक आहे. बॉलिवूडमध्ये पुर्वीच आलिया भट्ट ही प्रसिद्ध अभिनेत्री असल्याने कियाराने तिचे नाव बदलले.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

- Advertisement -

कियारा सध्या सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत असल्याच्या चर्चा बॉलिवूडमध्ये रंगत आहेत. दोघेही अनेकदा एकत्र व्हॅकेशन एंजॉय करण्यासाठी मालदिवमध्ये जातात पण अद्याप त्यांनी अधिकृतपणे रिलेशनमध्ये असल्याची घोषणा केली नाहीये.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

- Advertisement -

कियारा अडवाणी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. कियाराचे इंस्टाग्राम अकांऊटवर तब्बल 17.9 मिलीयन फॉलोवर्स आहेत. कियार नेहमीच आपल्या चाहत्यांना तिच्या कामाबद्दल तेसच आगामी चित्रपटाची माहिती सोशल मीडियाद्वारे शेअर करत असते. तसते कियारा तिचे व्यक्तीगत आयुष्य मीडियापासून दूर ठेवताना दिसते.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)


हे हि वाचा – ‘गिरा हुआ इंसान’ म्हणणाऱ्या सुनील पालला मनोज वाजपेयीचं सडेतोड उत्तर

- Advertisement -