घरट्रेंडिंगHBD Kirron Kher: लग्नासाठी घेतला घटस्फोट, काय आहे किरण - अनुपम खेरची...

HBD Kirron Kher: लग्नासाठी घेतला घटस्फोट, काय आहे किरण – अनुपम खेरची लव्ह स्टोरी?

Subscribe

किरण खेर या विवाहित असूनही अनुपम खेर यांच्या प्रेमात पडल्या. अनुपम यांच्याशी लग्नासाठी त्यांनी घटस्फोट घेतला.

बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर (Kirron Kher) आज त्यांचा ६९वा वाढदिवस साजरा करत आहे. किरण खेर यांनी त्यांच्या अभिनयातून नेहमीच चाहत्यांवर जादू केली आहे. त्यांच्या गालवरील डिंपल आजही सर्वांच्या लक्षात आहे. किरण खेर सध्या कॅन्सरच्या आजाराशी लढत आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक जणांनी त्यांच्या भावी आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. किरण खेर यांचा जन्म १४ जून १९५५ साली एका शीख परिवारात झाला. त्या मुळच्या पंजाबच्या चंदीगडच्या आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षणही चंदीगडमध्येच झाले. आज किरण खेर यांचे पती म्हणजेच अभिनेते अनुपम खेर यांनी किरण यांच्या वाढदिवसांनिमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्यात तर त्यांचे काही अनसिन फोटोही शेअर केले आहेत. चित्रपटात काम करता करता किरण खेर यांचे अभिनेते अनुपम खेर यांच्याशी सुर जुळले आणि दोघांनी लग्न केले. किरण खेर या विवाहित असूनही अनुपम खेर यांच्या प्रेमात पडल्या. अनुपम यांच्याशी लग्नासाठी त्यांनी घटस्फोट घेतला. काय आहे दोघांची प्रेमकहाणी जाणून घ्या.

- Advertisement -

अनुपम खेर आणि किरण यांची भेट चंदीगडमधील थिएटरमध्ये झाली. दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. त्यानंतर किरण करिअर करण्यासाठी मुंबईत आल्या आणि गौतम बेरी या बिझिनेस मॅनच्या प्रेमात पडल्या. त्यांना सिकंदर नावाचा एक मुलगा झाला. मात्र त्याचे नाते जास्त काळ टिकू शकले नाही. दोघेही त्याच्या आयुष्यात खुश नव्हते. अनुपम खेर यांच्याशी भेट झाल्यानंतर किरण खेर यांनी गौतम बेरी यांना घटस्फोट देऊन अनुपम खेर यांच्याशी विवाह केला. तर दुसरीकडे अनुपम खेर यांचेही लग्न झाले होते. मात्र तेही त्यांच्या आयुष्यात खुश नव्हते. त्यामुळे अनुपम खेर आणि किरण यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १९८५मध्ये दोघेही विवाहबंधनात अडकले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)


अनुपम खेर यांनी आज किरण यांच्या वाढदिवसानिमित्त एक फोस्ट शेअर केली आहे. शुभेच्छा देत त्यांनी असे म्हटले आहे की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा किरण, देव तुला खूप आयुष्य देवो. तू नेहमी निरोगी रहा. मी प्रार्थना करतो की तुला सगळे आनंद मिळो. जगातील सर्व लोक तुझ्यावर असचं प्रेम करुदेत. आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही कठीण प्रसंगला तू धिराने तोंड देऊ शकतेस. तुझे संपूर्ण आयुष्य निरोगी जावो. तुला खूप प्रेम आणि आशिर्वाद’

- Advertisement -

हेही वाचा – शिल्पाच्या पती राजने पूर्व पत्नीला घटस्फोट देण्याचे सांगितले कारण

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -