HBD: माल्याच्या ‘कॅलेंडर गर्ल’मध्ये झळकली होती लीजा

ऑस्ट्रेलियामध्ये लीजाने स्ट्रेच मार्क क्रीमची पहिली जाहिरात केली होती

HBD: Lisa Hayden starred in Mallya's 'Calendar Girl'
HBD: माल्याच्या 'कॅलेंडर गर्ल'मध्ये झळकली होती लीजा हेडन

बॉलिवुड अभिनेत्री लीजा हेडन काही दिवसांनपासून तिसऱ्यादां झालेल्या गरोदरपणाबद्दल सध्या लाईम लाइटमध्ये आहे.  लीजा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते अनेकदा ती आपल्या मुलांसोबत तसेच बेबी बंप फ्लॉटं करतांना फोटो पोस्ट करते. लीजा हेडनचा जन्म 17 जून, 1986 चेन्नई मध्ये झाला होता. लीजा यंदा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. लीजा मॉडल आणि ॲक्टर असून ती एक फॅशन डिजाइनर सुद्धा आहे. लीजाचे संपुर्ण नाव एलिजाबेथ मेरी हेडन असं आहे. लीजाचे वडील मलयाली आहेत तसेच आई ऑस्ट्रेलियन आहे. लीजा भारतात येण्यापुर्वी अफगानिस्तान आणि अमेरिकामध्ये राहत होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon)

लीजा लवकरच बनणार आहे आई.
लीजा तिसऱ्यांदा आई होणार आहे याआधी लीजाला दोन मुल आहेत. लीजाला होणारे तिसरे बाळ एक मुलगी असावी अशी तिची इच्छा असल्याचे अनेकदा तिने म्हंटले आहे. एका मुलाखती दरम्यान लीजाने सांगितलते होते की याच महीन्यामध्ये म्हणजेच जून महीन्यात ती तिसऱ्या आपत्याला जन्म देणार आहे. लीजा नेहमी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत आपल्या व्यक्तीगत आयुष्यातील अनेक फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असते. पण लीजाला सुद्धा अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. नुकतच काही दिवसांपुर्वी एका यूजरने तुला प्रेग्नेंट राहणे पसंद आहे का? असा सवाल केला होत. या प्रश्नाचे लीजाने अगदि मजेशीर अंदाजात उत्तर दिले होते.
‘आयशा’, ‘रास्कल’, ‘क्वीन’ सारख्या सिनेमात लीजा झळकली होती. पण लीजा हेडन ॲक्टिंग करण्यापुर्वी लीजाने जाहिरात क्षेत्रातमध्ये चांगलेच नाव कमावले होते. भारतात लीजा पहिल्यांदा हुंडई i20 कारच्या जाहिरतीत झळकली होती तर ऑस्ट्रेलियामध्ये लीजाने स्ट्रेच मार्क क्रीमची पहिली जाहिरात केली होती. लीजा लहानपणापसूनच हुशार होती तसेच तिला योग विद्याची देखिल आवड होती. तिने मनोविज्ञानमध्ये शिक्षणानंतर साइड जॉब साठी ऑस्ट्रेलिया मध्ये मॉडलिंग करण्यास सुरूवात केली होती. इतकच नाही तर लीजा हेडन साल 2011 मध्ये विजय माल्याच्या किंगफिशर कैलेंडरसाठी फोटोशूट केलं होतं.

हे हि वाचा – यंदा ईदला नाही तर दिवाळीमध्ये सलमान खान करणार ‘भाईजान’ रिलीज