घरमनोरंजनत्याला माहीत नाही... कंगनाने साधला आमीर खानवर निशाणा

त्याला माहीत नाही… कंगनाने साधला आमीर खानवर निशाणा

Subscribe

बॉलिवूडची धाकड गर्ल कंगना रनौत नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगना रनौत सामाजिक, राजकीय तसेच बॉलिवूड आणि बॉलिवूड कलाकारांवर वादग्रस्त वक्तव्य करत असते. नुकत्याच काहीदिवसांपूर्वी कंगनाने नाव न घेता रणबीर-आलियावर निशाणा साधला होता. अशातच आता कंगनाने बॉलिवूड अभिनेता आमीर खानवर देखील निशाणा साधला आहे.

खरं तर, अलीकडेच आमीर खान कादंबरीकार आणि स्तंभलेखक शोभा डे यांचे नवीन पुस्तक ‘Insatiable – My Hunger for Life’ च्या प्रमोशन इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्याला विचारण्यात आले की शोभा डेच्या भूमिकेसाठी कोणती अभिनेत्री योग्य असेल. आमीरने आलिया भट्ट, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा या अभिनेत्रींची निवड केली. यानंतर शोभा डे यांनी कंगना रनौतला विसरल्याची आठवण करून दिली. मग आमिरने तिला सशक्त अभिनेत्री म्हटले आणि ती देखील या भूमिकेत बसेल असं म्हणाला.

- Advertisement -

दरम्यान, या व्हिडीओ कंगना पर्यंत पोहोचताच तिने तो शेअर करत त्यावर प्रतिक्रिया देखील दिली आहे. त्यात तिने लिहिलंय की, “बिचारा आमीर खान… हाहाहा त्याने असा अभिनय करण्याचा पूर्ण प्रयत्न केला की त्याला माहित नाही की केवळ मीच तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री आहे. ज्यांचा त्याने उल्लेख केला आहे त्यांपैकी एकीकडे एक देखील नाही… धन्यवाद शोभा डे जी मला तुमची भूमिका करायला आवडेल.” असं कंगनाने लिहिलंय.

jagran

- Advertisement -

पुढे कंगनाने लिहिलंय की, “शोभा जी आणि माझे राजकीय विचारांचे मतभेद आहेत, पण तरीही त्यांनी माझ्या कलेचा, मेहनतीचा आणि समर्पणाचा आदर केला… तुमच्या नवीन पुस्तकासाठी शुभेच्छा. माफ करा, माझ्याकडे आधीच चार राष्ट्रीय पुरस्कार आणि एक पद्मश्री देखील आहे. … हे देखील माझ्या चाहत्यांनी मला आठवण करून दिली. कारण माझ्याकडे किती पुरस्कार आहेत हे मला देखील आठवत नाही.”

 


हेही वाचा :

‘कुडीए नी तेरे’ गाण्यावर अक्षय कुमार आणि नोरा फतेहीचा डान्स व्हिडीओ व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -