शूटचा पहिलाच दिवस आहे असे वाटले – शशांक केतकर

सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत आणि योग्य ती काळजी घेत मालिकेच्या सेटवर चित्रीकरणाला सुरुवात झाली.

शशांक केतकर

आता मालिकांचे शुटींग पुन्हा सुरू झाल्यामुळे कलाकाराचे रूटीनही सुरू झाले आहे. पण तब्बल ४ महिन्यांनंतर सेटवर गेल्यावर आज आपला शुटींगचा पहिला दिवस आहे असं काहीस वाटलय अभिनेता शशांक केतकरला. हे मन बावरे या मालिकेतील अभिनेता शशांक केतकर लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या शुटींगबद्दल बोलताना म्हणाला, ‘मी जवळपास चार महिन्याने सेटवर गेलो आणि समोर आमची टिम उभी होती तेंव्हा असे वाटलं की, खूप दिवसांनी काही भेटत नाहीये आपण या सगळ्यांना आताच सुट्टी संपली आणि मी सेटवर आलो आहे… पण जेंव्हा मंदार देवस्थळी यांचे लाईटस, कॅमेरा अॅक्शन हे शब्द कानावर पडले तेंव्हा अचानक पोटात गोळा आला आणि मालिकेचा पहिलं दिवस आठवला. एखादी मालिका सुरू असताना सगळ नवीन वाटण ही मला खूप सकारात्म्क गोष्ट वाटली. सगळे मिळून काम करत आहोत एकानव्या जोमाने, उत्साहाने शूट सुरू झाले आहे. एकमेकांचा हातभार मिळतो आहे. पुन्हाएकदा उभ रहाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहोत आम्ही सगळेच. खूप आनंद वाटतो आहे”.

सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत आणि योग्य ती काळजी घेत मालिकेच्या सेटवर चित्रीकरणाला सुरुवात झाली. शूटिंगला सुरुवात होण्याआधी जवळपासचा परिसर, मेकअप रूम्स, सेटचे सॅनिटाईझेशन करण्यात आले. मालिका आता रंजक वळणावर पोहचली आहे. येत्या काही भागात प्रेक्षकांना सरप्राईझ मिळणार हे नवीन आलेल्या प्रमोवरून कळत आहे.


हे ही वाचा – Raat Akeli hai trailer: Netflix वर नवाजुद्दीन सिद्दिकी उलगडणार मर्डर मिस्ट्री!