त्याने स्वतःच्या अभिनयाकडे लक्ष द्यावं…मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांचा अर्जुन कपूरवर निशाणा

एका पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी अर्जुन कपूरबाबत आपंल मत मांडलं त्यावेळी ते म्हणाले की, "आता कोणता फ्लॉप आणि वैतागलेला अभिनेता जनतेला धमकावत आहे हे चांगलं वाटत नाही जनतेला अशा प्रकारे धमकावन्यापेक्षा त्याने आपल्या अभिनयाकडे लक्ष द्यायला हवे

सध्या बॉलिवूडमधील प्रदर्शित होणारे चित्रपट बॉक्श ऑफिसवर भरघोस कमाई करण्यात असफल ठरत आहेत. एकानंतर एक चित्रपट प्रदर्शित होत आहेत परंतु प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात जाण्यास पसंती दर्शवत नाहीत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी ‘लाल सिंह चड्ढा’ आणि ‘रक्षाबंधन’ हे चित्रपट प्रदर्शित झाले मात्र या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. दरम्यान, आता या चित्रपटांमुळे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये चित्रपटांबाबत चिंता सतावत आहे.

दरम्यान, नुकत्याच काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरने याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यावेळी तो म्हणाला होता की, “मला वाटतं की, खूप दिवसांपासून शांत राहून आम्ही चूक केली आहे. आमच्या शांत बसण्याला आमचा कमकुवतपणा समजला जात आहे. आम्ही नेहमीच या गोष्टीवर विश्वास ठेवत आलो आहोत की, जे पण होईल शांत राहायचं, आपलं काम स्वताः उत्तरं देईल.” अशा शब्दात अर्जुन कपूरने प्रतिक्रिया दिली होती.

दरम्यान, आता अर्जुन कपूरच्या या वक्तव्यावर मध्य प्रदेशातील गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी निशाणा साधला आहे. नरोत्तम मिश्रा यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून अर्जुन कपूरला फ्लॉप अभिनेता म्हणत लिहिलंय की, “अभिनेता अर्जुन कपूरला जनतेला अशा प्रकारे धमकावन चांगली गोष्ट नाही. जनतेला धमकावन्यापेक्षा त्याने स्वतःच्या अभिनयाकडे लक्ष द्यावं. तुमच्या चित्रपटांमध्ये हिंदू धर्माला टारगेट करणारे कलाकार चित्रपटावर बहिष्कार टाकल्यावर जनतेवर धमकावतात.” अशा तिखट शब्दात नरोत्तम मिश्रा यांनी अर्जुन कपूरला उत्तर दिलं.

तसेच एका पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी अर्जुन कपूरबाबत आपंल मत मांडलं त्यावेळी ते म्हणाले की, “आता कोणता फ्लॉप आणि वैतागलेला अभिनेता जनतेला धमकावत आहे हे चांगलं वाटत नाही जनतेला अशा प्रकारे धमकावन्यापेक्षा त्याने आपल्या अभिनयाकडे लक्ष द्यायला हवे. तेव्हा ते मी योग्य समजेन आणि माझा एक प्रश्न आहे की ते हिंदू धर्मावर आधारित चित्रपट तयार करतील तसेच हिंदूंच्या अपमानावर एखादा शब्द बोलू शकतील? एवढी हिंमत आहे का त्यांच्यामध्ये, फक्त आमच्या हिंदू धर्मांतील लोकांसोबत असं करून जनतेलाच धमकी देतात. तुम्ही सुद्धा वाट बघा आता अर्जुन साहेब..आता जनता जागरूक झाली आहे.”


हेही वाचा :चित्रपटांवर होत असलेल्या बहिष्कारावर अर्जुन कपूरने व्यक्त केला संताप