घरमनोरंजन'ब्रँडी पिऊन तो महिलांना किस करायचा'

‘ब्रँडी पिऊन तो महिलांना किस करायचा’

Subscribe

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’अर्थात माधुरी दीक्षित हिच्या सौंदर्याची भुरळ आजही पडते यात काहीही शंका नाही.अनिल कपूर, अक्षय कुमार, शाहरुख खान ते सलमानपर्यंत अगदी सगळ्या बॉलीवूड कलाकारांबरोबर माधुरी दीक्षितने काम केलेलं आहे. 90 च्या दशकांत तिने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत, तसेच अनेक कलाकारांसोबत बोल्ड सीनही दिले. आजही माधुरीचे लाखो चाहते आहेत. पण काही वर्षांपूर्वी माधुरीची प्रचंड क्रेझ तिच्या चाहत्यांमध्ये होती. त्यामुळे त्याच्याशी संबंधित अनेक किस्से सतत चर्चेत असतात. अनेक किस्से तिच्याबद्दल ऐकायलाही मिळतात.

अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये असा एक चित्रपट देखील केला, ज्याबद्दल तिला कदाचित अजूनही पश्चात्ताप आहे.हा चित्रपट होता ‘वर्दी’, ज्यामध्ये माधुरीसोबत सनी देओल आणि जॅकी श्रॉफ सारखे स्टार्स लीड रोलमध्ये होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता, मात्र त्यानंतरही माधुरी दीक्षित या चित्रपटाच्या रिलीजने अजिबात खूश नव्हती. कारण, माधुरीने असे काही सीन्स दिले होते, ज्यात त्या दिवसांत माधुरी खूप निराश झाली होती. इतकंच नाही तर चित्रपटात तिचे बरेच सीनही कापले गेले होते आणि त्यामुळे अभिनेत्री खूप दुःखी होती.

- Advertisement -

जॅकी श्रॉफने 40 वर्षांच्या कारकिर्दीत अभिनेत्रींसोबत अनेक इंटिमेट सीन केले असले तरी ते करताना तो अस्वस्थ होता. एका जुन्या मुलाखतीत जॅकीने वर्दी चित्रपटात माधुरी दीक्षितला किस करताना लाज वाटली हे उघड केले जॅकी म्हणाले, “मी वर्दीमध्ये माधुरी दीक्षित आणि जुही चावलाचे चुंबन घेतले आहे, पण मला त्याची लाज वाटली. ब्रँडीच्या शॉट्समुळे मला स्क्रीनवरील इतर महिलांना किस करण्यात मदत झाली. मला सेक्सी श्रॉफ म्हटले जायचे , पण नंतर मी किसिंग सीन करण्यापासून दूर राहिलो.”

वर्दी नंतर , माधुरी दीक्षित जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर यांच्यासोबत, राम लखन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आणि लोकांमध्ये प्रचंड हिट झाला.पण माधुरीला तिच्या बोल्ड सीन करण्याच्या आणि वर्दीमध्ये छोट्या भूमिकेत दिसण्याच्या तिच्या निर्णयावर नेहमीच पश्चाताप होतो. तिचे सीन का कापले, हा चित्रपट का साइन केला? असा प्रश्न तिला पडला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -