“ते माझे सर्वात मोठे चीअरलीडर होते…” सतीश कौशिक यांच्या निधनावर कंगनाची भावूक पोस्ट

बॉलिवूडमधील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचे बुधवारी (8 मार्च) निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. याबाबत अभिनेते अनुपम खेर यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली होती. सतिश कौशिक यांच्या निधनामुळे बॉलिवूड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सतीश कौशिक गुडगाव येथील एका फार्महाऊसवर गेले होते. तिथून परतत असताना त्यांना गाडीतच हृदयविकाराचा झटका आला. सध्या त्यांचे पार्थिव दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात असून लवकरच मुंबईत आणले जाणार आहे. आज त्यांच्यावर मुंबईतच अंत्यसंस्कार होणार आहेत.

अभिनेते अनुपम खेर यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली सतीश कौशिक यांच्या निधनाबाबत माहिती दिली होती. ही दुःखद बातमी कळताच बॉलिवूड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्री कंगना रनौतने देखील आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन सतीश कौशिक यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

कंगनाने सतीश कौशिक यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत लिहिलंय की, “आज माझी सकाळ या भयानक बातमीने झाली. ते माझे सर्वात मोठे चीअरलीडर होते, खूप यशस्वी अभिनेते आणि दिग्दर्शक होते. सतीश कौशिक वैयक्तिकरित्या एक अतिशय दयाळू आणि प्रामाणिक व्यक्ती होते, मला त्यांना ‘इमर्जन्सी’मध्ये दिग्दर्शित करणं आवडत होतं. त्याची आठवण येईल, ओम शांती.” अशी भावूक पोस्ट कंगनाने लिहिली आहे.

कंगना व्यतिरिक्त अभिनेता रितेश देशमुखने देखील सतीश कौशिक यांच्या निधनावर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. रितेशने पोस्टमध्ये लिहिलंय की, “तूम्ही गेलात यावर विश्वास बसत नाही. तुमचे हसणे आजही माझ्या कानात घुमते. एक दयाळू आणि उदार सह-अभिनेता असण्यासाठी धन्यवाद, शिक्षक असल्याबद्दल धन्यवाद. तुमची नेहमी आठवण येईल, तुमचा वारसा आमच्या हृदयात जिवंत राहील.” असं रितेश म्हणाला.

 


हेही वाचा :

बॉलिवूड कलाकारांसोबत ठरली अखेरची होळी, सतीश कौशिक यांची शेवटची पोस्ट चर्चेत