घरमनोरंजननेहा कक्करचा आवाज एकून अनु मलिकने स्वत:च्याच कानाखाली वाजवली

नेहा कक्करचा आवाज एकून अनु मलिकने स्वत:च्याच कानाखाली वाजवली

Subscribe

नेहाच्या प्रत्येक गाण्यावर आज अख्खी तरुणाई फिदा आहे. इंडिअन आयडल सारख्या रिअॅलिटी शोमधून नेहाने आपल्या गाण्याच्या कारकिर्दिला सुरुवात केली होती.

आपल्या मधुर आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी नेहा कक्कर हिने अल्पवधीतच सिनेसृष्टीत तिची वेगळी ओळख तयार केली आहे. नेहाच्या प्रत्येक गाण्यावर आज अख्खी तरुणाई फिदा आहे. इंडिअन आयडल सारख्या रिअॅलिटी शोमधून नेहाने आपल्या गाण्याच्या कारकिर्दिला सुरुवात केली होती. यानंतर एकामागून एक हिट गाणी घेवून येत ती बॉलिवूडची सिंगींग सुपरस्टार झाली आहे. सध्या ती इंडिअन आयडल रिअॅलिटी शोची जज् म्हणून काम करत आहे. यादरम्यान नेहाचा एक जुना व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इंडिअन आयडलच्या दुसऱ्या पर्वाचा आहे. या पर्वात नेहा एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या ऑडिशनमध्ये नेहा ऐसा लगता है हे रोमॅन्टिक गाणे गाताना दिसत आहे. सोनू निगम, फराह खान आणि अनूमलिक या कार्यक्रमात परिक्षक आहेत. व्हिडिओत नेहा गाणे गात असते. मात्र ते गाणे ऐकल्यानंतर अनु मलिक याचा राग अनावर होत होतो. व ते तिला मध्येच रोखतात. व तुझा आवाज ऐकून माला माझ्या कानाखाली वाजवावीशी वाटत आहे असे म्हणून स्वता:च्या कानाखाली मारुन घेतात.

 अशी विचित्र प्रतिक्रिया ऐकून नेहा कक्कर नर्व्हस होते आणि परिक्षकांकडे पाहत असते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. इंडियन आडिअल च्या दुसऱ्या पर्वातील परिक्षक अनु मलिक यांच्याकडून अशा लाजिरवाण्या प्रकाराला सामोरे जाणारी नेहा कक्कर ही आता इंडिअन आयडल च्या १२ व्या पर्वाची परिक्षक आहे. सोबतच यापूर्वी ती अनु मलिक यांच्याबरोबर या कार्यक्रमाचे परिक्षण करताना दिसली होती.

- Advertisement -

हे वाचा-  दीपिकाचा ‘MAMI’च्या अध्यक्षपदाला रामराम!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -