Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनWomen's Day 2025 : अभिनेत्रींची पडद्यामागील हृदयस्पर्शी कथा

Women’s Day 2025 : अभिनेत्रींची पडद्यामागील हृदयस्पर्शी कथा

Subscribe

‘सन मराठी’ वरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. ‘सन मराठी’ वाहिनी प्रत्येक मालिकेतून महिलांनी सक्षम व खंबीर उभं राहील पाहिजे हा सल्ला देत आहे. याचसह कोणत्याही स्त्रीला कधी संघर्ष चुकत नाही. सामान्य स्त्री असो किंवा अभिनेत्री प्रत्येक स्त्री संघर्ष करत पुढे जात असते. ‘सन मराठी’वरील अभिनेत्रींनी समस्त स्त्री वर्गाला महिला दिनाच्या शुभेच्छा देत असताना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण सांगितला आहे.

‘नवी जन्मेन मी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मुग्धा शहा म्हणाल्या की, माझ्या मुलांमुळे माझं आयुष्य बदललं असं म्हणायला हरकत नाही. माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा माझ्या नवऱ्याचा पगार 650 रुपये होता. पुढे जाऊन या पगारात मुलांचं पालनपोषण करणं कठीण होत गेलं. म्हणून मी 100 रुपयांचा पार्लरचा कोर्स केला.त्यानंतर पार्लरमध्ये काम, याचसह आणखी छोटी मोठी कामे करत. सिनेविश्वात 1 दिवसासाठी काम करण्यास सुरुवात केली. मी जे हलाखीचे दिवस काढले तसं मुलांनी जगलं नाही पाहिजे हा निश्चय करत मी खंबीर उभी राहिली. आजही जुने दिवस आठवले की अंगावर काटा येतो. प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी जगलं पाहिजे.”

‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेतील मम्मी हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री विद्या सावळे यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देत सांगितलं की, ” 2006 साली मी माझ्या नवऱ्यापासून विभक्त झाले आणि माझ्या दोन मुलींचं संगोपन एकटीने करायचं ठरवलं. या प्रवासात माझ्या आई-बाबांनी मला साथ दिली. 2016 साली माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. बऱ्याच मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत मी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. महिलांना मी एवढंच सांगेन की, आयुष्यात संघर्ष आला तर घाबरू नका. खंबीर राहून परिस्थितीला सामोरे जा तुम्हालाही यश नक्कीच मिळेल.”

‘जुळली गाठ गं’ या मालिकेत दामिनी ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुरेखा कुडची म्हणाल्या की, “1996 मध्ये मी कलाक्षेत्रात पाऊल ठेवलं. जेष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांच्यामुळे माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं. मुख्य अभिनेत्री म्हणून माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. आजही मी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. कालांतराने  माझ्या आयुष्यात दुःखद घटना घडली. माझी लेक 3 वर्षांची असताना माझ्या नवऱ्याच निधन झालं. सासरची परिस्थितीही बेताची होती. पण तेव्हापासून आजपर्यंत मी कधी डगमगले नाही.

हेही वाचा : Womens Day 2025 : महिलांनी आवर्जून पाहावे हे सिनेमे


Edited By : Prachi Manjrekar