HomeमनोरंजनHeena Khan : ब्रेस्ट कॅन्सरग्रस्त हिना खानचा मोटिव्हेशनल संदेश

Heena Khan : ब्रेस्ट कॅन्सरग्रस्त हिना खानचा मोटिव्हेशनल संदेश

Subscribe

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री हिना खान आणि तिचे कुटुंबीय गेल्या काही दिवसांपासून खूप वाईट ताणाचा सामना करत आहेत. हिनाला स्टेज 3 चा ब्रेस्ट कॅन्सर आहे. अभिनेत्रीने सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. या बातमीमुळे तिचे सगळेच चाहते सध्या थक्क आहेत. हिना खानने सांगितलं की तिचे यावर उपचार सुरू आहेत. आणि ती कॅन्सरशी लढण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकताच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याला पाहून लोक तिच्या या निश्चयाला सलाम करताना दिसून येतायत.

काल रात्री उशिरा हिनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती आधी फोटोशूट करताना आणि नंतर एका अॅवॉर्ड फंक्शनमध्ये सामील होताना दिसतेय. यासोबतच हिनाने आपल्या पहिल्या कीमोथेरपीचे फोटोजही शेअर केले आहेत. आणि सांगितलं आहे की ब्रेस्ट कॅन्सरबद्दल माहित पडलेलं असूनसुद्धा तिने हा अॅवॉर्ड शो अटेंड केला आणि या शोनंतर ती सरळ हॉस्पिटलमध्ये गेली. या व्हिडीओसोबत तिने एक मोटिव्हेशनल व्हिडीओही शेअर केला आहे.

हिनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, “या अवॉर्ड नाइटमध्ये, मला माझ्या आजाराबद्दल माहित होते, परंतु मी नॉर्मल राहण्याचे प्रयत्न केले. केवळ मीच नाही तर सगळ्यांनीच. याच एका दिवसाने सारं काही बदललं, याच दिवसापासून माझ्या आयुष्याचा सर्वात आव्हानात्मक टप्पा सुरु झालाय.”

हिनाने पुढे म्हटलंय, ” चला आज एक गोष्ट लक्षात ठेवू. आपण तसेच होतो, जसा आपण विचार करतो. मी या आव्हानाला एका संधीप्रमाणे स्विकारलंय. ज्यामुळे मी स्वत:ला आणखी मजबूत बनवू शकेन. मी माझ्या टूलकिटमध्ये पहिलं टूल पॉझिटिव्हिटीचं ठेवलंय. मी याला स्वत:करता नॉर्मलाइज करायचं ठरवलंय. माझ्यासाठी माझं काम महत्त्वाचं आहे, माझी प्रेरणा, जिद्द आणि कला माझ्यासाठी महत्त्वाची आहे. मी झुकणार नाही. हा पुरस्कार जो मला मिळाला आहे ते माझं केवळ एकच ध्येय नव्हतं. मी सगळ्यांना आवाहन करते की आपल्या आयुष्यात आलेल्या सगळ्या अडचणींना सामान्य बनवा. आणि आपलं ध्येय निश्चित करा व ते पूर्ण करायचा प्रयत्न करा. भले ते कितीही कठीण असो. कधीच पाठी हटू नका. कधीच हार मानू नका.”

हिना खानने सांगितलं की हा कार्यक्रम अटेंड केल्यानंतर ती तिच्या पहिल्या किमोथेरपीसाठी सरळ हॉस्पिटलमध्ये गेली. तिने म्हटलंय की कधीच अडचणींपासून दूर पळू नका. समस्या कितीही मोठी असली तरी हार कधीच मानू नका.”

हिनाच्या या सोशल मिडीयावरील पोस्टला लोकांनी खूप लाईक्स दिले आहेत. आणि तिच्या हिंमतीला दाद दिली आहे. सेलिब्रिटी आणि अनेक चाहत्यांनी तिला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.