Homeमनोरंजनवैजयंती माला यांना पद्म विभूषण पुरस्कार जाहिर झाल्यावर हेमा मालिनींची पोस्ट

वैजयंती माला यांना पद्म विभूषण पुरस्कार जाहिर झाल्यावर हेमा मालिनींची पोस्ट

Subscribe

बॉलिवूडमधील दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंती माला यांना 26 जानेवारी रोजी केंद्र सरकारकडून पद्म विभूषण पुरस्कार जाहिर झाला. वैजयंती माला यांना पुरस्कार मिळाल्याने अभिनेत्री हेमा मालिनी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय त्यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे.

हेमा मालिनींची पोस्ट चर्चेत

हेमा मालिनी यांनी वैजयंती माला आणि त्यांच्या कुटुंबीयांबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. हेमा मालिनी यांनी हे फोटो शेअर करत लिहिलंय की,“हा माझ्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय दिवस आहे. काल माझी वैजयंती माला आणि त्यांच्या कुटुंबीयांची त्यांच्या चेन्नईतील घरी भेट झाली. त्यांचं संपूर्ण आयुष्य नृत्यमय आहे. या भेटीत इंडस्ट्रीतील त्यांचा अनुभव याविषयी जुन्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळतं. मला या प्रेमळ महिलेकडून खूप सारं प्रेम मिळालं. त्या आतून आणि बाहेरून खूप सुंदर आहेत.”

13 वर्षी केली करिअरला सुरूवात

वैजयंती माला यांनी वयाच्या 13 व्या वर्षापासून आपल्या करिअरला सुरूवात केली. त्यांचा पहिला चित्रपट ‘वड़कई’ होता. त्यानंतर त्यांनी तमिळ चित्रपट ‘जीवितम’मध्ये काम केले. त्या बॉलिवूडमध्ये 1961 दिलीप कुमार यांच्या ‘गंगा-जमुना’ चित्रपटात दिसल्या होत्या. बॉलिवुडमध्ये ‘संगीत’ चित्रपटानंतर त्यांना जास्त यश मिळालं.

 


हेही वाचा :

12th Fail : फिल्मफेअर मिळाल्यानंतर विक्रांत मॅसी भेटला खऱ्या ‘हीरो’ला; फोटो केला शेअर