Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Sakinaka Rape Case - तिचीच चूक असणार!, अभिनेत्री हेमांगी कवीची संतप्त प्रतिक्रिया

Sakinaka Rape Case – तिचीच चूक असणार!, अभिनेत्री हेमांगी कवीची संतप्त प्रतिक्रिया

अभिनेत्री हेमांगी कवी हिने देखील आपल्या फेसबुक अकांऊटवर एक पोस्ट शेअर करत या कृत्याविरोधात आवाज उठवला आहे.

Related Story

- Advertisement -

मुंबईत निर्भया घटनेची पुनरावृत्ती करणारी संतापजनक घटना घडली आहे. 10 सप्टेंबर रोजी साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार करुन आरोपींनी गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय आणि संतापजनक प्रकार घडला. मात्र सनिवारी उपचारादरम्यान या महिलेची मृत्यूशी झूंज अपयशी ठरली. या राक्षसी प्रवृतीचा विरोध करत अनेक राजकारणी मंडळी तसेच सामान्य व्यक्तीपांसून ते सेलिब्रिटींपर्यत अनेकांनी संतपाजनक भावन व्यक्त केल्या आहे. दरम्यान, अभिनेत्री हेमांगी (hemangi kavi) कवी हिने देखील आपल्या फेसबुक अकांऊटवर एक पोस्ट शेअर करत या कृत्याविरोधात आवाज उठवला आहे.(hemangi kavi reacts sakinaka rape case mumbai)

अभिनेत्री हेमांगी कवीने स्त्रियांना सहन कराव्या लागणाऱ्या परिस्थितीवर आपले मत मांडले आहे. हेमांगीने लिहले आहे की,आणखी एक तिचीच चूक असणार!तिचे कपडे चुकले असतील!एवढ्या रात्री ती काय करत होती? एकटी होती की कुणासोबत होती? तिची जात काय, धर्म काय, कुठे काम करत होती? किती कमवत होती? लग्न झालेली होती, single होती, divorcee होती, मुलं बाळं किती? ती मुंबईची की आणखी कुठली! सगळं सगळं तीचंच चुकलं असणार!
चला आता आपण तिलाच आणखीन घाबरऊन ठेऊया!बाकी त्याला कसलंच बंधन नको, सगळी सूट देऊया! काय?. कोणतीही घटना घडली की स्त्रींयाना सर्वात आधी बोल लावला जातो. कादाचित हिच्यामुळेच काही घडले असावे. या प्रवृत्तीचा विरोध करत हेमांगीने आपल्या भावनांना वाट मोकळी केली आहे.

- Advertisement -


हे हि वाचा – KKK11- शोच्या फिनाले पूर्वीच अभिनव शुक्ला झाला आऊट,चाहते झाले नाराज

- Advertisement -