घरमनोरंजनअभिनेत्री हेमांगी कवीचा छोट्या पडद्यावर प्रवेश

अभिनेत्री हेमांगी कवीचा छोट्या पडद्यावर प्रवेश

Subscribe

‘फुलपाखरू’ या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. लवकरच या मालिकेत एक नवा चेहरा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. अभिनेत्री हेमांगी कवी मालिकेत योगा टीचर म्हणून येणार आहे.

मराठी वाहिन्यांच्या स्पर्धेत नव्याने आलेल्या झी युवा या वाहिनेनी अल्पावधीतच तरूणांची मनं जिंकली. वाहिनीवरील तरूणांशी निगडीत मालिकांमुळे झी युवा अल्पावधीतच लोकप्रिय झाली. तर याच वाहिनीवरील ‘फुलपाखरू’ या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. लवकरच या मालिकेत एक नवा चेहरा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. अभिनेत्री हेमांगी कवी मालिकेत योगा टीचर म्हणून येणार आहे.

मालिका क्षेत्रातही हेमांगी उमटवणार ठसा

चित्रपट- नाटक या माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविलेल्या हेमांगीने फुलपाखरू मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. हेमांगी मालिकेत एका योग टीचरच्या भूमिकेत दिसणार आहे. हेमांगीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे त्यामुळे तिच्या या नवीन पात्राला देखील प्रेक्षक तितकंच प्रेम देतील यात शंकाच नाही.
“माझ्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात छोट्या पडद्यावर झाली त्यामुळे मी या माध्यमात काम करण्यासाठी नेहमीच उत्साही असते. फुलपाखरूची संपूर्ण टीम खूप एनर्जेटिक आहे त्यामुळे त्यांच्यासोबत काम करतानादेखील खूप मजा येते. प्रेक्षकांनी नेहमीच माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे आणि या पुढेही माझ्या कामावर असंच प्रेम करतील याची मला खात्री आहे.” अशी भावना यावेळी हेमांगीनं व्यक्त केली.

- Advertisement -

मानस – वैदेही तरूणांच्या गळ्यातला ताईत

फुलपाखरू या मालिकेतील वैदेही आणि मानस सगळ्या प्रेक्षकांचे लाडके आहेत. कॉलेजच्या अल्लड वयात जुळलेलं प्रेम, त्यांचा एकमेकांवरचा लटका राग, त्यांची खोडकर मस्ती, थोडे रुसवे – फुगवे, एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या मानस आणि वैदेहीची ही प्रेमकथा ‘फुलपाखरू’ मध्ये सगळ्यांनीच अनुभवली. या मालिकेतील अनेक ट्विस्ट्स अँड टर्न्स अनुभवले. आता या मालिकेत एक नवा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या नवीन पात्रावर म्हणजेच हेमांगी कवीवरही प्रेक्षक तितकच प्रेम करतील यात शंकाच नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -