ऐश्वर्या राय बच्चन इंस्टाग्रामवर केवळ ‘या’ एकाचं व्यक्तीला करतेयं फॉलो

Here's the Only Celebrity Aishwarya Rai Bachchan Follows on Social Media
ऐश्वर्या राय बच्चन इंस्टाग्रामवर केवळ 'या' एकाचं व्यक्तीला करतेयं फॉलो

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिला विश्वसुंदरी या नावाने ओळखले जाते. आजवर तिने देवदास, जोधा अकबर, हम दिल दे चुके समन, जोश यांसारख्या कित्येक सुपरहिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आजही तिचा चाहता वर्ग मोठा देखील मोठा आहे. सोशल मीडियावरही ती अधिक सक्रिय असते. आपल्या हॉट, हटके फोटो आणि व्हिडिओंच्या माध्यमातून काय चाहत्यांची मने जिंकत असते. त्यामुळे देशसह जगभरातील मोठा चाहता वर्ग तिला सोशल मीडियावर फॉलो करतो. पण हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, ऐश्वर्या राय बच्चन इन्स्टाग्रामवर केवळ एकाच व्यक्तीला फॉलो करते.

ऐश्वर्या रायला इन्स्टाग्रामवर सध्आ ९.५ मिलियन युजर्स फॉलो करतात. तिचे देश-विदेशात लाखो-करोडो चाहते आहेत. ऐश्वर्याचे इंस्टाग्राम अकाउंट पाहिले तर ती फक्त कुटुंबियांसोबतचे फोटो शेअर करत असते. यात पती अभिषेक बच्चन, मुलगी आराध्य, सासरे अमिताभ बच्चन यांच्याच पोस्टनं भरलेलं आहे. सध्या ती तिचा अधिक वेळ परिवाराला देत आहे. असे असले तरी ती इन्स्टाग्रामवर तिचा पती अभिषेक बच्चन यालाच फक्त फॉलो करते. यावरून अनेकदा तिला प्रश्न विचारण्यात आला, मात्र नेहमीप्रमाणे तिने उत्तर देणे टाळले.

ऐश्वर्या २००७मध्ये अभिषेकसह लग्न केले. यानंतर २०११ मध्ये त्यांना मुलगी झाली. त्यानंतर या दोघांनी धूम २, उमरावजान आणि गुरू यांसारख्या सिनेमांत एकत्र काम केले आहे. सध्या ऐश्वर्या मणिरत्न यांच्या ‘पोन्नियन सेल्वन’ या सिनेमावर काम करत आहे.


जॅकी श्रॉफ म्हणतायतं, ‘लेकीसाठी मुलगा शोधणं झालयं कठीण’