घरताज्या घडामोडीटायगर श्रॉफच्या 'Heropanti 2'चा नवा पोस्टर रिलीज

टायगर श्रॉफच्या ‘Heropanti 2’चा नवा पोस्टर रिलीज

Subscribe

टायगरच्या 'हीरोपंती २'चा नवा पोस्टर चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे आता त्याच्या चाहत्यांमध्ये 'हीरोपंती २' चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी उत्सुकता लागली आहे.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आगामी चित्रपट ‘हीरोपंती २’मध्ये (Heropanti 2) पुन्हा एकदा स्टंट करताना दिसणार आहे. यावर्षी ईदीच्या मुहूर्तावर टायगरचा ‘हीरोपंती २’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या, १७ मार्चला प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी टायगरच्या या आगामी चित्रपटाचा नवा पोस्टर रिलीज झाला आहे. यामध्ये टायगर जबरदस्त अंदाजात दिसत आहे. टायगरसोबत या चित्रपटात तारा सुतारियाना दिसणार आहे. या चित्रपटातील तिच्या लूकचा पोस्टरही रिलीज करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

टायगरने ‘हीरोपंती २’चा नवा पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत लिहिले आहे की, ‘अॅक्शन, स्वॅग आणि हीरोपंती सर्वांना येत नाही आणि माझी जात नाही.’ टायगरच्या ‘हीरोपंती २’चा नवा पोस्टर चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे आता त्याच्या चाहत्यांमध्ये ‘हीरोपंती २’ चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी उत्सुकता लागली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

- Advertisement -

यंदा टायगरसाठी ईद-ख्रिसमस खास

एका मुलाखतीमध्ये टायगर श्रॉफ म्हणाला होता की, ‘हे वर्ष माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण माझे दोन चित्रपट ‘हीरोपंती २’ आणि ‘गणपथ’ ईद आणि ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहेत.’

- Advertisement -

माध्यमाच्या माहितीनुसार, अहमद खान दिग्दर्शित ‘हीरोपंती २’ चित्रपट २९ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवालाने आपल्या प्रोडक्शन हाऊस नाडियाडवाल ग्रँडसन एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार केला आहे. या चित्रपटात टायगर व्यतिरिक्त नवाजुद्दीन सिद्दीकी आणि तारा सुतारियान प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी टायगर आणि तारा ‘स्टूडंट ऑफ द ईअर २’ चित्रपटात एकत्र दिसले होते.


हेही वाचा – SRK Plus: शाहरूख देणार ओटीटी प्लॅटफॉर्मला काॅंटे की टक्कर


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -