घरमनोरंजनHeropanti 2 : चित्रपट रिलीज होण्याआधी टायगर श्रॉफ आणि तारा सुतारियाने दिली...

Heropanti 2 : चित्रपट रिलीज होण्याआधी टायगर श्रॉफ आणि तारा सुतारियाने दिली धार्मिक स्थळांना भेट

Subscribe

२७ एप्रिल रोजी टायगर आणि तारा यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. ते त्यांच्या 'हीरोपंती २' या चित्रपटासाठी आशिर्वाद घेण्यासाठी मुंबईमधील माहिम येथील दरग्यामध्ये पोहोचले.

बॉलिवूडचा अॅक्शन स्टार टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री तारा सुतारिया त्यांच्या ‘हीरोपंती २’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. सध्या टायगर श्रॉफ आणि ‘तारा सुतारिया हीरोपंती २’ चा प्रमोशन करत आहेत. अहमद खानद्वारा दिग्दर्शित या अॅक्शन चित्रपटाची टीम चित्रपटाच्या प्रमोशनची कोणतीच संधी सोडत नाहीयेत. या चित्रपटांच्या गाण्यांची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान या चित्रपटाची संपूर्ण कास्ट मुंबईमधील एका दरग्यामध्ये पोहोचली आहे.

- Advertisement -

२७ एप्रिल रोजी टायगर आणि तारा यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. ते त्यांच्या ‘हीरोपंती २’ या चित्रपटासाठी आशिर्वाद घेण्यासाठी मुंबईमधील माहिम येथील दरग्यामध्ये पोहोचले. त्यावेळी टायगरने गुलाबी रंगाचा कुर्ता घातला होता, आणि ताराने पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस घातला होता. शिवाय ताराने डोक्यावर तिची ओढणी घेतली होती, तर टायगर श्रॉफने डोक्याला रूमालाने झाकलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

इतकंच नव्हे तर, दरग्यामध्ये जाऊन आल्यानंतर टायगर आणि तारा मुंबईमधील ‘बाबुलनाथ मंदिर’ येथे गेले. तिथे त्यांनी भगवान शंकरांचे दर्शन घेतले. याशिवाय टायगर श्रॉफ आपल्या प्रत्येक चित्रपट रिलीज व्हायच्या आधी धार्मिक स्थळांना भेट देतो.

टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि साजिद नाडियावाला यांचा हा चित्रपट 29 एप्रिल 2022 रोजी रिलीज होणार आहे. टायगरचा हा चित्रपट अॅक्शन आणि मनोरंजन अशा पद्धतीचा असून या चित्रपटात टायगरसोबत तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची सुद्धा मुख्य भूमिका आहे.

 

कन्नड अभिनेता किच्चा सुदीपच्या हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषा न मानण्याच्या वादग्रस्त वक्तव्यावर अजय देवगणने दिलं सनसनीत उत्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -