महेश मांजरेकरांना HC चा दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई नाही

High court says no strict action till next hearing against Mahesh Manjrekar
महेश मांजरेकरांना HC चा दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई नाही

Mumbai:  नाय वरण भात लोन्चा या सिनेमातील आक्षेपार्य दृश्यांप्रकरणी निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पुढील सुनावणी होईपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश हायकोर्टाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. महेश मांजरेकरांविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टाने स्पष्ट नकार दिला होता त्यामुळे महेश मांजरेकरांना अटक होण्याची शक्यता होती मात्र आज झालेल्या सुनावणीत मांजरेकरांवर कारवाई न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  तपासात पोलिसांना सहकार्य करण्यास तयार असल्याची ग्वाही मांजरेकरांनी दिली आहे. त्यामुळे अटकेपासून मांजरेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नाय वरण भात लोन्चा सिनेमातील आक्षेपार्ह दृश्यांप्रकरणी दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि सिनेमातील अन्य निर्मात्यांना हायकोर्टाकडून मिळाला आहे. पुढील सुनावणी होईपर्यंत त्यांना अटक न करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

नाय वरण भात लोन्चा कोन नाय कोन्चा या नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये काही आक्षेपार्ह दृश्यांविरोधात मुंबई पोलिसांत एक तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी यासंदर्भात कोणतीही कारवाई न केल्याने तक्रारदाराने मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली. सत्र न्यायालयाने मुंबई पोलिसांना निर्देश दिल्यानंतर माहिम पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई पोलीस आता यासंदर्भात तपास करत आहेत.

पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर महेश मांजरेकर आणि सिनेमाच्या इतर निर्मात्यांना अटक होण्याची शक्यता असल्याने दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घ्यावा किंवा त्याला तूर्तास स्थगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणीत हायकोर्टाने आधी मांजरेकरांना संरक्षण देण्यास पूर्णपणे नकार दिला होता. आणि आज झालेल्या सुनावणीत मांजरेकरांवर पुढील सुनावणी होईपर्यंत कोणताही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत.


हेही वाचा –  महेश मांजरेकरांना बेड्या ठोकणार? अटकेपासून संरक्षण देण्यास HC चा नकार