घरमनोरंजनबातम्यांवर रोख लावणे म्हणजे प्रसारमाध्यमांच्या अभिव्यक्तीवर गदा, शिल्पाची मागणी धोकादायक...हायकोर्ट

बातम्यांवर रोख लावणे म्हणजे प्रसारमाध्यमांच्या अभिव्यक्तीवर गदा, शिल्पाची मागणी धोकादायक…हायकोर्ट

Subscribe

याचिकेद्वारे शिल्पाने माध्यमाकडे माफीची मागणी केली असून २५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यास सांगितले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पति राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यापासूनच शिल्पा आणि राज दोघेही  माध्यमांच्या तसेच पोलिसांच्या रडारावर आले आहेत. नुकतच शिल्पा शेट्टीने २९ पत्रकार आणि माध्यमांविरोधात मानहानी केल्याची याचिका हायकोर्टात दाखल केली होती. पण न्यायलयाने देखील शिल्पाला आता चांगलचं फटकारले आहे. शिल्पाची मागणी फेटळून लावत न्यायलयाने म्हंटले आहे की, प्रसिद्धीमाध्यमांना वृत्तांकन करण्यापासून थांबवणे किंवा मज्जाव केल्यास तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे, त्याचवेळी माध्यमांचे स्वातंत्र्य एखाद्या व्यक्तीच्या गोपनीयतेच्या अधिकाराशी संतुलित असणे आवश्यक असल्याचेही म्हटले.

याचप्रमाणे न्यायमुर्ती गौतम पटेल  पुढे म्हणाले  की, पत्रकारीता आणि पत्रकार अभिव्यक्तीशी जोडली गेली आहे. त्यामुळे चांगली आणि वाईट पत्रकारिता कशाला म्हणावे या संदर्भात न्यायालयालाही मर्यादा आहेत. तसेच शिल्पाने केलेली मागणी ही धोकादायक आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण-
शिल्पाने या याचिकेद्वारे माध्यमांवरील प्रतिमा मलीन करणाऱ्या बातम्यांना आळा घालण्याची मागणी केली आहे. या याचिकेत अनेक उदाहरण शिल्पाने दिली आहेत. पॉर्न फिल्मप्रकरणात तिचा सहभाग असल्याबाबत आणि तिने याप्रकरणाच्या तपासावर प्रतिक्रिया दिल्याबाबतच्या चुकीच्या बातम्यांचे उदाहरण तिने सादर केले आहेत. याचिकेद्वारे शिल्पाने माध्यमाकडे माफीची मागणी केली असून २५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यास सांगितले आहे. तसेच बदनामी करणाऱ्या बातम्या सर्व ताबडतोब काढून टाकाव्यात, अशी विनंती याचिकेच्या माध्यमातून केली आहे


हे हि वाचा –  प्रार्थनाने ‘आपली यारी’ गाण्याच्या निमित्ताने दिला कॉलेजच्या दिवसातील मैत्रीला उजाळा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -