लॉकडाऊनमध्ये तयार केली ३०० गाणी, लवकरच हिमेशचा नवा प्रोजेक्ट येणार

himesh reshamiya said that he prepared three hundred songs in national lockdown and soon will launch his project
लॉकडाऊनमध्ये तयार केली ३०० गाणी, लवकरच हिमेशचा नवा प्रोजेक्ट येणार

संगीतकार आणि गायक हिमेश रेशमिया काही काळापासून बॉलिवूड म्युझिक इंटस्ट्रीचा एक महत्त्वाचा भाग आहे. हिमेश रेशमियाने सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटापासून करिअरला सुरुवात केली. यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये सुपरहिट संगीत दिले आहे आणि आपल्या आवाजाने लोकांना त्याने भुरळ घातली. नुकतच हिमेशने संगीतकार राजेश रोशनच्या एमएक्स प्लेअर टाईम्स ऑफ म्युझिकशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे सध्या एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल चर्चा सुरू आहे.

हिमेशने नुकताच इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधला. त्यावेळे त्याला विचारले की, लॉकडाऊनमध्ये स्वतःला व्यस्त कसे ठेवत होतास? यावर हिमेश म्हणाला की, मी एका मोठ्या प्रोजेसक्टसाठी ७०० गाणी संगीतबद्ध केली आहे. त्यापैकी ३०० गाणी लॉकडाऊनमध्ये संगीतबद्ध केली आहेत. या प्राजेक्टमुळे मला नवीन गाणी संगीतबद्ध करण्याची प्रेरणा मिळाली. लवकरच या प्रोजेक्टची घोषणा करणार आहे. तसेच आजच्या काळानुसार अनेक मेलोडी आपल्याला ऐकायला मिळतील.

पुढे हिमेश म्हणाला की, रीमिक्सचा काळ संपला आहे. आता खूप रीमिक्स गाणी ऐकली आहेत आणि आता ओरिजिनल म्युझिक कडे जाण्याची वेळ आली आहे. असे फक्त प्रेक्षक नाहीतर म्युझिक इंडस्ट्रीतील इतर कलाकारांकडून ऐकू येत आहे. तसेच यावेळी भारतीय म्युझिक बाबत देखील हिमेश रेशमियाने आपले मत मांडले. तो म्हणाले की, भारतात म्युझिक पूर्णपणे स्वतंत्र असेल पाहिजे आणि आता तसेच घडताना दिसत आहे. संपूर्ण जगाशी तुलना केली तर भारतातील म्युझिक वेगळे आहे.


हेही वाचा – नानावटी रुग्णालयाकडून अमिताभ यांच्याबद्दलच्या ‘त्या’ मेसेजवर स्पष्टीकरण!