Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Father's Dday च्या दिवशी हिना खान झाली भावुक शेअर केला वडीलांसोबतचा खास...

Father’s Dday च्या दिवशी हिना खान झाली भावुक शेअर केला वडीलांसोबतचा खास फोटो

हिना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते ती नेहमी स्वत:चे तसेच वडीलांसोबतचे व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करते. व्हिडीओ मध्ये हिना आणि तिच्या वडिलांची खास बॉंडिंग चाहत्यांना दिसायची. 

Related Story

- Advertisement -

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानच्या (hina khan) वडीलांचे नुकतच काही दिवसांपुर्वी हृदय विकाराच्या झटक्याने आकस्मित निधन झाले होते. आज फादर्स डे (20 जून) च्या निमित्ताने या खास दिवशी हिनाने वडीलांच्या आठवणीत एक भावनीक पोस्ट शेअर केली आहे. हिनाने आपल्या वडीलांसोबत क्लिक केलेल्या काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. हिनाने या फोटोला भावनिक कॅप्शन देत लिहलं आहे की, ‘ हॅप्पी फादर्स डे..जून 20, आज तुम्हाला जाऊन दोन महीने पालटले. 7 महीन्यांपुर्वी हा फोटो काढला होत आणि हे फोटो मी तुम्हाला दाखवले नाही मी हे फोटोज खास दिवशी पोस्ट करणार होती. पण असा विचार कधीच केला नव्हता की या दिवशी फोटो शेअर करेन. तुम्हाला हे फोटो पाहायचे होते डॅड,जे आपण ठरवले होते ?मिस यू…हॅप्पी फादर्स डे डॅडी…आय लव यू”.

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

- Advertisement -

हिनाच्या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी लाइक्सचा पाऊस पाडला आहे तसेच चाहतेही हिना आणि तिच्या वडीलांचा फोटो पाहुन भावुक झाले आहे.हिनाने आपल्या अभिनयाची सुरुवात ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेद्वारे केली होती. तसेच आत्तापर्यंत हिनाचा प्रवास पाहता अनेक रीयालिटी शोमध्ये सुद्धा सहभाग घेतला होता. इतकेच नाही तर हिना खानने आंतराष्ट्रीय स्तरावरील कांन्स फेस्टिवल मधील रेड कारपेटवर झळकली आहे. हिना अभिनय क्षेत्रात करियर करत असल्यामुळे अनेक नातेवाईकांनी त्यांच्या परिवाराशी नातं तोडलं होतं. अनेकदा बिग बॉसच्या घरामध्ये असतांना हिना खान आपल्या वडिलांविषयी बोलताना दिसायची. तसेच वडिलांसोबत झालेले मजेशीर किस्से घरातील सदस्यांना सांगायची. हिना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते ती नेहमी स्वत:चे तसेच वडीलांसोबतचे व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करते. व्हिडीओ मध्ये हिना आणि तिच्या वडिलांची खास बॉंडिंग चाहत्यांना दिसायची.


हे हि वाचा – Father’s Day 2021 Songs: ‘पापा मेरे पापा’,’डैडी कूल’आज सुद्धा फेमस आहेत हे बॉलिवुड साँग

- Advertisement -