HomeमनोरंजनHina Khan shares pics : हिना खानने पहिल्या केमोथेरपीनंतर पोस्ट केला फोटो

Hina Khan shares pics : हिना खानने पहिल्या केमोथेरपीनंतर पोस्ट केला फोटो

Subscribe

तिसऱ्या स्टेजच्या स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत असलेल्या हिना खानने अनेक छायाचित्रे शेअर केली. कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, "या चित्रात तुम्हाला काय दिसते? माझ्या शरीरावरचे डाग की माझ्या डोळ्यातील आशा?

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खानने अलीकडेच तिच्या केमोथेरपीच्या जखमा दाखवत काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये हिना खूप धाडसी आणि आशावादी दिसत आहे. यावर तिच्या चाहत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. हिनाच्या प्रत्येक पोस्टवर प्रत्येकजण आशावादी आणि ती बरी व्हावी यासाठी प्रार्थना करताना दिसत आहे.

तिसऱ्या स्टेजच्या स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत असलेल्या हिना खानने अनेक छायाचित्रे शेअर केली. कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, “या चित्रात तुम्हाला काय दिसते? माझ्या शरीरावरचे डाग की माझ्या डोळ्यातील आशा? ते डाग माझे आहेत, मी त्यांना प्रेमाने मिठी मारते कारण ते माझ्या प्रगतीचे पहिले लक्षण आहेत. माझ्या डोळ्यांतील आशा हे माझ्या आत्म्याचे प्रतिबिंब आहे, मी माझ्या उपचारांना प्रकट करत आहे.”

हिनाने काही दिवसांपूर्वी तिचे केस कापतानाचा व्हिडिओ देखील शेअर केला होता. यावर सुद्धा तिला अनेक कमेंट्स आल्या आहेत .

पण कॅन्सर पेशंट केस का कापतात ? यामागे नेमकं कारण काय ? हे हि जाणून घेऊयात

कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे आणि त्याचे उपचारही खूप महाग आहेत. यामध्ये खूप औषधेही घ्यावी लागतात. कर्करोगाच्या रुग्णांना अनेक औषधे घ्यावी लागतात आणि त्यांना वेदना कमी करण्यासाठी अनेक प्रकारची इंजेक्शने देखील दिली जातात. परंतु या औषधांचे आणि इंजेक्शनचे रुग्णावर दुष्परिणाम होतात आणि त्याचा सर्वात जास्त परिणाम त्यांच्यावर होतो केसांवरत्यामुळेच त्यांचे केस गळतात.

याचे एक कारण म्हणजे केमोथेरपी. कर्करोगाच्या रुग्णांना केमोथेरपी दिली जाते, परंतु केमोथेरपीमध्ये वापरल्या जाणाऱ्या केमिकलमुळे कर्करोगाच्या रुग्णांचे केस गळतात. याशिवाय रुग्णाला संसर्गापासून वाचवण्यासाठी त्यांचे केसही कापले जातात . तसेच, केस गळण्याची समस्या कमी करण्यासाठी स्कॅल्प कूलिंग केले जाऊ शकते आणि यामध्ये केस पूर्णपणे कापले जातात.उपचार झाल्यानंतर केस परत येतात. पण काही उदाहरणे आहेत जिथे केस आले नाहीत. पण हे दुर्मिळ आहे. कर्करोगाशी झुंज देणारे पेशंट हे नेहमीच सकारात्मक असणं गरजेचं आहे.त्यांची इच्छाशक्ती यातून त्यांना बरी करू शकते

हे हि वाचा: Dharmaveer 2 : धर्मवीर 2 नव्या रूपात ‘ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की’