छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री हिना खान (Hina Khan) ही सध्या स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत आहे. काही महिन्यांपूर्वी हिना खान हिला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्याचं समोर आलं. तिच्या कुटुंबासाठी तसंच चाहत्यांसाठी हा धक्काच होता. या संकटाला ती मोठ्या धीरानं सामोरी जात आहे. आठवड्यांपूर्वी हिनाची पहिली कीमोथेरेपी झाली होती. आता पुन्हा एकदा तिला या वेदनादायी प्रक्रियेतून जावं लागत आहे. आता हिनानं कीमोथेरेपीच्या साइडइफेक्ट्समुळे दुसऱ्या एका आजाराचा सामना करावा लागत असल्याचं सांगितलंय.
हिना खान सध्या थर्ड स्टेज कॅन्सरवर उपचार घेत आहे. तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कीमोथेरेपीमुळे साइडइफेक्ट्स झाल्याचं सांगितलं आहे. या साइडइफेक्ट्समुळे तिला म्यूकोसाइटिस नावाचा आजार झाला. तिनं पोस्ट मध्ये लिहिलं की, कीमोथेरेपीचा आणखी एक साइड इफेक्ट् म्हणजे म्यूकोसाइटिस. यावर मी डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधं घेत आहे, त्यांच्या सूचनांचं पालन करतेय. तुमच्यापैकी कोणाला हा आजार झाला होता का? मला घरगुती काही उपाय असतील तर प्लिज सांगा. हे खूप अवघड आहे, ज्यावेळी आपण काही खाऊ शकत नाही, ही बाब खूपच कठीण आहे. त्यामुळे तुम्ही दिलेल्या माहितीचा मला फायदा होईल असेही हिनाने म्हटले.
View this post on Instagram
तसंच हिनानं आणखी एक हेल्थ अपडेट शेअर केलं आहे. ही तिची पाचवी कीमोथेरेपी होती आणि आणखी तीन सेशन बाकी असल्याचंही म्हटलं. काही दिवस कठीण असतात आणि काही खूपच खूपच कठीण असतात, जसा की आजचा दिवस आहे आणि मला आज खूप बरं वाटत असल्याचे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
हेही वाचा : Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण झाला घराचा नवा कॅप्टन; बिग बॉसची भन्नाट बॅनरबाजी
Edited By : Nikita Shinde