हिंदुस्तानी भाऊने एकता कपूर आणि तिच्या आईविरोधात केला एफआयआर दाखल!

आज सकाळी खार रोड पोलीस ठाण्यात हिंदुस्तानी भाऊने एकता कपूर आणि शोभा कपूर विरोधात एफआयआर दाखल केला आहे.

hindustani bhau file police complaint against ekta kapoor objection on her web series obscene scene
हिंदुस्तानी भाऊने एकता कपूर आणि तिच्या आईविरोधात केला एफआयआर दाखल!

बिग बॉस १३ फेम हिंदुस्तानी भाऊ म्हणजेच विकास पाठक याने यावेळी दिग्दर्शिका एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूरवर निशाणा साधला आहे. एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊने आज सकाळी मुंबईतील खार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. रविवारी भाऊने एक इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्याने लिहिले होते की, ‘तो बॉलिवूड सेलिब्रिटी विरोधात एफआयआर दाखल करणार आहे.’ त्या पोस्टमध्ये त्याने एकताचे नाव लिहिले होते ना तिच्या आईचे.

पण आता भाऊने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो खार पोलीस ठाण्यात असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्या विरोधात एफआयआर दाखल केल्याचे सांगितले आहे. तसेच व्हिडिओत त्याने एक तक्रारीची एक प्रत देखील दाखवली आहे.

एकता कपूर आणि तिच्या आईवर काय आहे नक्की आरोप?

हिंदुस्तानी भाऊने असा आरोप केला की, एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्या एका वेबसीरिजमध्ये भारतीय जवान आणि लष्करी वर्दीचा अपमान केला आहे. या वेबसीरिजमध्ये जवान आपल्या कर्तव्यावर गेल्यानंतर त्यांची पत्नी आपल्या बॉयफ्रेंडसोबत लैंगिक संबंध ठेवते. यादरम्यान ती त्याला लष्करी पोशाख घालते आणि फाडताना दाखवले आहे. या सीनवर आक्षेप घेत भाऊने एकता आणि तिच्या आई विरोधात तक्रार दाखल केली आहे. भाऊने या व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केला आहे.


हेही वाचा – Coronavirus: पॉझिटिव्ह असल्यास सरकार करणार खर्च; ‘या’ देशात पर्यटकांसाठी खास ऑफर