Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Holi 2021 : सारा अली खानचे होळी सेलिब्रेशनमध्ये व्हायरल होतोय 'चायवाला'

Holi 2021 : सारा अली खानचे होळी सेलिब्रेशनमध्ये व्हायरल होतोय ‘चायवाला’

Related Story

- Advertisement -

देशभरात सध्या होळीचा उत्साह पाहयला मिळतोय. कोरोना असला तरी बॉलिवूड सेलिब्रिटीसचा होळीचा उत्साह जराही कमी झालेला नाही. यात अभिनेत्री सारा अली खानेही अनोखे होळी सेलिब्रिशन करत आहे. या होळी सेलिब्रिशनचा व्हिडिओ साराने आापल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. तिच्या या होळी सेलिब्रेशनच्या व्हिडिओतच सध्या एक चायवाला ट्रेन्डींगमध्ये आला आहे.

कारण साराने चहाच्या टपरीच्या माध्यमातून वडील सैफ अली खान यांच्यावरील प्रेम दाखवण्याची अनोखी पद्धत शोधून काढली आहे. या चहाच्या टपरीचे नाव ‘सैफ चाय वाला’ असे असे आहे. या टपरीबाहेरील एक फोटो साराने आपल्या इंस्टाग्राम अकाउंडवर शेअर केला आहे. यात साराने व्हाइट कलरचा कुर्ता लेंहन्गा मधील एथनिक लुकमध्ये पोज देताना दिसत आहे. या फोटोसह साराने ‘आई लव्ह माई डॅड’ अशी कॅप्शन दिली आहे. अतरंगी रे चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानचे हे फोटो शेअर केले आहेत.

- Advertisement -

साराने नुकतीच या आगामी चित्रपट ‘अतरंगी रे’ ची शुटिंग पूर्ण केली. या शुटिंगदरम्यानचे अनेक फोटो साराने इंस्ट्राग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये सारानं लिहिले की, ‘शुटिंग अखेर संपली, आनंद एल रॉय सर मला हा रोल, चित्रपट दिल्याबद्दल धन्यवाद, प्रेम, पाठिंबा, भारत दर्शन, चविष्ट खाद्यपदार्थ, सुर्योदय, सूफी संध्याकाळ आणि बेस्ट टीमसोबतचं नेहमीच आठवणीत राहिलं असं वर्ष या सगळ्यासाठी धन्यवाद. या पोस्टमध्ये सारानं धनुषला चांगला प्रेरणादायी पार्टनर असल्याचं म्हटलं आहे. साराच्या वर्कफ्रिंटबद्दल सांगायचे झाल्यास, सारा कुली नंबर १ या चित्रपटात वरूण धवनसह झळकली. तर आगामी अतरंगी रे या चित्रपटात झळकणार आहे. सध्या साराकडे आगामी मोठे प्रोजेक्ट नाहीत.


 

- Advertisement -