घरट्रेंडिंगHoli Hindi Hit Songs : बॉलिवूडच्या 'या' गाण्यांसोबत होळीचा माहोल करा...

Holi Hindi Hit Songs : बॉलिवूडच्या ‘या’ गाण्यांसोबत होळीचा माहोल करा आणखी रंगीबेरंगी

Subscribe

होळी म्हटलं की रंग आले आणि होळीचे हेच रंग बॉलिवूडच्या गाण्यांशिवाय फिके आहेत. सण कोणताही असो बॉलिवूडची काही धम्माल गाणी वाजल्याशिवाय मज्जा नाही.

Holi Hindi Hit Songs : होळीला काही तास उरले आहेत. सर्वत्र होळीचा रंगीन माहोल पहायला मिळत आहे. लोकांवर होळीचा रंग चढण्यासही सुरूवात झालीये. होळी म्हटलं की रंग आले आणि होळीचे हेच रंग बॉलिवूडच्या गाण्यांशिवाय फिके आहेत. सण कोणताही असो बॉलिवूडची काही धम्माल गाणी वाजल्याशिवाय मज्जा नाही. होळीचा माहोल आणखी रंगीबेरंगी करण्यासाठी बॉलिवूडची काही गाणी नक्की ऐका.

रंग बरसे चुनरवाली ( सिलसिला )

- Advertisement -

या गाण्याचा सिलसिल गेली अनेक वर्ष बॉलिवूडवर आहे. होळी म्हटलं की रंग बरसे चुनरवाली हे गाणं हमखास वाजवलचं जातं. अमिताभ बच्चन, रेखावर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे.

बलम पिचकारी ( ये जवानी हैं दिवानी )

- Advertisement -

 

आताच्या तरुण पिढीमध्ये बलम पिचकारी हे गाणं माहिती नसेल असे होणारच नाही. रणबीर आणि दीपिकाचं बलम पिचकारी गाण्याने होळीचा आनंद नेक्स्ट लेव्हलला घेऊन जाऊ शकता.

 

होली खेले रघुवीरा ( बागबान )

होळीच्या दिवसासाठी हमखास वाजणाऱ्या गाण्यांपैकी होली खेले रघुवीरा हे एक गाणं. अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्यावर गाणं चित्रीत करण्यात आलंय.

डू मी ए फेवर लेट्स प्ले होली ( वक्त )

 

होळीच्या दिवशी प्रियंका चोप्राच्या या गाण्याची डिमांड होतेच होते. हे गाणं पार्टीचा माहोल तयार करते.

होली के दिन दिल खिल जाते हैं ( शोले )

होळीच्या रंगात रंगून जायचं असेल तर हेमा मालिनीच्या होली के दिन दिल खिल जाते है गाणं होळीच्या दिवशी वाजलचं पाहिजे.


हेही वाचा – Holi 2022 : रंगपंचमीला तुमच्या राशीनुसार वापरा ‘हे’ रंग; वाढेल यश, मिळेल किर्ती

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -