घरताज्या घडामोडीसर्जरी करुन 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री बनली पुरुष, शेअर केले सिक्स पॅक एब्सचे...

सर्जरी करुन ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली पुरुष, शेअर केले सिक्स पॅक एब्सचे फोटो

Subscribe

एलटने 'जूनो' आणि 'इंसेप्शन' यासारख्या सुपरहिट सिनेमात काम केले आहे

गेल्या काही वर्षांत बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील अनेकांनी आपण ट्रान्सजेंडर असल्याचे सांगितले. सर्जरी करुन आता त्यांनी त्यांचे नवीन आयुष्य सुरु केले आहे. हॉलीवुडची प्रसिद्ध सुपरस्टार ट्रान्सजेंडर अभिनेत्री एलेन पेजने (Ellen Page) स्वत:ची सर्जरी केली. एलेन आता एलट पेज या नावाने ओळखली जाते. नुकतीच तिने तिच्या सिक्स पॅक अँप्सचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. २०२० मध्ये एलटने एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ती ट्रान्सजेंडर असल्याचे सांगितले. त्यानंतर तिने सर्जरी केल्यानंतर पहिल्यांदा सिक्स पॅक्स अँप्सचे फोटो शेअर करुन चाहत्यांना सरप्राइज दिले आहे.

एलटने ‘जूनो’ आणि ‘इंसेप्शन’ यासारख्या सुपरहिट सिनेमात काम केले आहे. ओपेरा विन्फ्रेला दिलेल्या मुलाखतीत एलटने असे म्हटले होते की, माझे लहानपण अगदी सामान्य होते. मात्र किशोरवयात शरीरात होणाऱ्या बदलांनी मी बेचन झालो. त्या काळात मी टॉम बॉय सारखा राहत होतो. मात्र त्याच काळात माझे हॉलिवूडमधील करिअर जोमाने सुरु झाले होते. त्याचवेळेस मी माझ्या वयक्तिक आयुष्यात त्रासलो होतो.

- Advertisement -

२००७ मध्ये एलटने जूनो या सिनेमाता काम केले. त्या सिनेमाच्या प्रमोशनच्या काळात ऑस्करच्या रेड कार्पेटवर मला ड्रेस घालायचा नव्हता तरीही मी घातला. तेव्हाचे फोटोही मला पहावत नाहीत,असे एलटने सांगितले. त्याचप्रमाणे एलटने इंसेप्शन सिनेमाचीही एक आठवण शेअर केली. त्यात त्याने असे म्हटले की, इंसेप्शन सिनेमाच्या प्रीमियरच्या वेळीही मला ड्रेस घालायचा होता. त्यावेळी मी पॅनिक झालो आणि मला पॅनिक अटॅक आला.

एलट सांगतो की, त्याला महिलांचे कपडे परिधान करायला अजिबात आवडत नाहीत. सर्जरी नंतर मी  पुन्हा एकदा मला भेटलो असे एलट म्हणतो. तरुण वयापासून मानसिक संघर्ष करत आलो आहे. त्यामुळे ट्रान्सजेंडर लोकांच्या भावना मला माहिती आहे मी त्यांचे पूर्णपणे समर्पण करतो.

- Advertisement -

हेही वाचा – संजय दत्त ठरला UAEचा गोल्डन व्हीझा मिळवणारा पहिला बॉलिवूड अभिनेता!

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -