HomeमनोरंजनUntold Story : 8 लग्न करूनही प्रेम न मिळालेली अभिनेत्री

Untold Story : 8 लग्न करूनही प्रेम न मिळालेली अभिनेत्री

Subscribe

Elizabeth Taylor Untold Story : फिल्म इडस्ट्री म्हटलं की सेलिब्रिटींच्या चित्रपटांसोबतच त्याचे खासगी आयुष्य तेवढेच चर्चेत राहतं. अशीच एक प्रसिद्ध अभिनेत्री होती, तिने 13 वर्ष बॉक्स ऑफिस गाजवलं. शिवाय सर्वाधिक मानधन घेणारी ही अभिनेत्री होती. ही अभिनेत्री बॉलिवूड, टॉलिवूडची नाही तर हॉलिवूडची होती. ही अशी अभिनेत्री जिने सहा दशक इंडस्ट्री गाजवली. तिचे चित्रपट तर चर्चेत राहिलेच आहेत पण त्याहीपेक्षा तिचे अफेअर आणि लग्नाच्या गोष्टी जास्त चर्चेत राहिल्या आहेत.

ही अभिनेत्री म्हणजे सौंदर्याच्याबाबतीत सर्वच अभिनेत्रींना मागे टाकणारी अभिनेत्री तिचं नाव एलिझाबेथ टेलर. तिने बाल कलाकार म्हणून सुरुवात केली आणि अनेक हिट चित्रपट दिले. एलिझाबेथ ही हॉलिवूडची टॉप अभिनेत्री. एका रिपोर्टनुसार तिने 1957 ते 1970 किंवा एकूण 13 वर्षे बॉक्स ऑफिसवर राज्य केले. 1960 च्या दशकात जगातील सर्वाधिक कमाई करणारी फिल्म स्टार बनली. पण या अभिनेत्रीने बॉक्स ऑफिसवर राज्य तर केलंच पण ती जास्त चर्चेत राहिली ते तिने केलेल्या 8 लग्नांमुळे.

एलिझाबेथचं वैयक्तिक आयुष्य कोणत्याही फिल्मी कहाणीप्रमाणेच रोमांचक आणि चढ-उतारांनी भरलेलं राहिलं आहे. एलिझाबेथने आयुष्यात 8 वेळा लग्न केलं होतं. त्यातही तिने एकाच व्यक्तीसोबत दोन वेळा लग्न केलं. तिच्या आयुष्याविषयी रंजक कहाणी जाणून घ्या.

8 लग्नांमुळे एलिझाबेथ टेलर चर्चेत :

अभिनेत्री एलिझाबेथ टेलरचं पहिलं लग्न कॉनराड निकी हिल्टन याच्यासोबत झालं, पण हे नातं फार काळ टिकलं नाही. लग्नानंतर लगेचच दोघांमध्ये खटके उडू लागले आणि त्यांच्या घटस्फोट झाला.

हिल्टनपासून वेगळं झाल्यानंतर एलिझाबेथने मायकल वाइल्डिंगशी दुसरे लग्न केलं. त्यांचे हे लग्न खूप चर्चेत होते कारण मायकेल तिच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठा होता. मग काही वर्षांनी दोघांमध्ये मतभेद निर्माण होऊ लागले आणि ते विभक्त झाले.

मायकल वाइल्डिंगपासून घटस्फोट घेतल्यानंतर, तिची भेट मायकल टॉडसोबत झाली. एलिझाबेथने मायकलसोबत तिसरं लग्न केलं. काही काळानंतर मायकेल टॉडचा मृत्यू झाला, त्यानंतर एलिझाबेथच्या आयुष्यात एडी फिशरने एन्ट्री घेतली.

फिशर आधीच विवाहित होता. तरीही, एलिझाबेथ आणि फिशर यांच्या प्रेमसंबंध निर्माण झाले आणि एलिझाबेथने एडी फिशरशी चौथं लग्न केलं. मग फिशरपासून घटस्फोट घेतल्यानंतर, हॉलिवूड अभिनेता एलिझाबेथ रिचर्ड बर्टनच्या प्रेमात पडली.

एलिझाबेथ आणि रिचर्ड बर्टन दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं आणि त्यांनी लग्न केले. हे एलिझाचे पाचवं लग्न होते. पण रिचर्ड बर्टनसोबतचे तिचे लग्नही फार काळ टिकले नाही आणि त्यांच्या नात्यात दुरावा आला. नंतर दोघांचा घटस्फोट झाला.

एलिझाबेथ आणि रिचर्ड यांच्यातील प्रेमाने त्यांना पुन्हा जवळ आणले आणि सुमारे दीड वर्षांनी 16 महिने वेगळं राहिल्यानंतर दोघांनी पुन्हा लग्न केले. एलिझाबेथचे हे सहावे लग्न होते. इतकं होऊनही त्यांचं नातं टिकू शकलं नाही.

यानंतर, एलिझाबेथने जॉन वॉर्नरशी सातवं लग्न केलं, पण परस्पर वादामुळे अखेर दोघेही वेगळे झाले. एलिझावेथने लॅरी फोर्टेन्स्कीशी आठवे लग्न केलं.