हॅालीवूडपटांची मेजवानी आता मराठीत !

‘अल्ट्रा हॅालीवूड’ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हॅालीवूडपटांची मेजवानी मराठीत पहायला मिळणार

Hollywood movie see in marathi language on altra hollywood youtube channel
हॅालीवूडपटांची मेजवानी आता मराठीत !

भारतात हॅालीवूडपटांचा स्वत:चा असा मोठा चाहता वर्ग आहे. हॅालीवूड चित्रपट असो किंवा सीरिज त्या बघण्याची एक वेगळीच मजा असते. या चाहत्यांसाठी आणि हॅालीवूड चित्रपटप्रेमी रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बहुचर्चित एकापेक्षा एक हॅालीवूड चित्रपटांची मेजवानी त्यांना आता घरबसल्या घेता येणार आहे ते सुद्धा चक्क मराठीत!

प्रेक्षकांच्या मनोरंजनाची अचूक नस ओळखून त्यांचे मनोरंजन करण्याची किमया अल्ट्राने चांगलीच साधली आहे. वेगवेगळया संकल्पना व मनोरंजनाचे व्यासपीठ उपलब्ध करुन देत त्यांनी अनेक नानाविध मनोरजंनाचा खजिना आजवर प्रेक्षकांसाठी आणला आहे. आता आपल्या ‘अल्ट्रा हॅालीवूड’ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी हॅालीवूडपटांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आणली आहे.

‘अगेंस्ट द वाइल्ड II’, ‘बार्क रेंजर’, ‘ज्युरासिक गॅलेक्सी’, ‘सिजलिंग बेबी पांडा’, ‘रसेल मॅडनेस’, ‘कॉन्ट्रैक्ट टू किल’, ‘द डिफेंडर’, ‘वेक ऑफ़ डेथ’, ‘द स्टोलन प्रिंसेस’, ‘एयर ३’, ‘एयर ४, ‘एयर ५’ यासारखे अनेक गाजलेले हॅालीवूडपट पहायला मिळणार आहेत. अल्ट्राच्या ‘हॉलीवूड मराठी’ व ‘अल्ट्रा किड्स’ या यूट्यूब चॅनलच्या विभागात मराठीत डब केलेले गाजलेले हॉलीवूड आणि अॅनिमेशन चित्रपट पहाता येणार आहेत.

‘अल्ट्राचे वेगवेगळे फेसबुक पेज अत्यंत लोकप्रिय असून, जगभरातील प्रेक्षकांचा याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक आकर्षक कलाकृतींची रेलचेल ‘अल्ट्रा’च्या विविध पेजवर पहायला मिळते. ज्याला आजवर जागतिक स्तरावर चांगले व्ह्यूज मिळाले आहेत. हॅालीवूडपटांची क्रेझ लक्षात घेता हे चित्रपट प्रेक्षकांसाठी अनोखी ट्रीट ठरतील असा विश्वास अल्ट्रा मीडिया आणि एंटरटेनमेंट ग्रुपचे सीईओ, सुशीलकुमार अग्रवाल यांनी व्यक्त केला.


हेही वाचा – Bhediya First Look: वरुण धवनच्या ‘भेडिया’चा धडकी भरवणारा फर्स्ट लुक पाहिलात का?