मराठी वाहिनीवरील लोकप्रिय ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे, ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे. या मालिकेत रोज काहींना काहीतरी घडामोडी घडताना दिसत आहेत, सोबतच अप्पीचा कलेक्टर बनण्याचा प्रवास सुद्धा सुरु झालाय आणि यात तिला अर्जुनची साथ मिळतेय, लवकरच मालिकेत अप्पी लग्नानंतरची पहिली संक्रांत साजरी करताना आपण पाहणार आहोत.हलव्याचे दागिने घालून दोघे सजलेले आपण पाहू शकणार आहोत.
तसेच आपल्या आवडत्या राणादा आणि अंजलीबाईची सुद्धा लग्नानंतरची पहिली संक्रांत साजरी होणार ‘होम मिनिस्टर’ च्या 1 तासाच्या विशेष भागाच्या निमित्ताने.
View this post on Instagram
तेव्हा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि पाहायला विसरू नका ‘होम मिनिस्टर’ मकरसंक्रांत विशेष भाग १५ जानेवारी संध्या. ६ वा. आणि ‘अप्पी आमची कलेक्टर’ संध्या. ७ वा.
हेही वाचा :