Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी राज कुंद्रावर कारवाई एकाच केसपुरती मर्यादित नाही, पॉर्न प्रकरणावर गृहमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

राज कुंद्रावर कारवाई एकाच केसपुरती मर्यादित नाही, पॉर्न प्रकरणावर गृहमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

राज कुंद्रा ज्या व्हिडिओसाठी काम करत होता ते व्हिडिओ एरोटिक व्हिडिओ होते.

Related Story

- Advertisement -

उद्योगपती आणि बलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपटाचे चित्रिकरण आणि सोशल मीडियावरुन अॅप्सवर विकण्याच्या आरोपाखाली मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. राज कुंद्राला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्रावरील कारवाई एकाच केसपुरती मर्यादीत नाही असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. गृहमंत्री वळसे पाटील यांनी या प्रकरणावर पहिलीच प्रतिक्रिया दिली असून मुंबई पोलीस योग्य कारवाई करत असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे. राज कुंद्रासह त्याच्या ९ सहकाऱ्यांनाही अटक केली आहे.

राज कुंद्राला पॉर्न फिल्म शूट करुन विकण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. राज्याच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील एका कार्यक्रमासाठी पुण्यात दाखल झाले होते यावेळी त्यांनी राज कुंद्रा प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज कुंद्राच्या प्रकरणाबाबत वळसे पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता. उत्तरामध्ये गृहमंत्री वळसे पाटील यांनी म्हटलंय की, सामजामध्ये जो विषय निषिद्ध आहे. त्यामध्ये जर कोणी चुकीचं वागत असेल तर पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई एकाच केसपुरती मर्यादाती राहणार नाही. अशा गोष्टी कशा थांबवता किंवा मर्यादित ठेवता येईल किंवा यातून कसा मार्ग काढला जाऊ शकतो यावर आम्ही प्रयत्न करत असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देशात चर्चेचा विषय असलेल्या पेगॅसस प्रकरणावरही भाष्य केलं आहे. पेगॅसस प्रकरण हा विषय केवळ राज्यापुरती मर्यादित नाही आहे. देशासोबत याचा जगालाही फटका बसला आहे. परंतू राज्यात आम्ही वस्तुस्थिती तपासून पाहणार आहे. त्या पद्धतीने कामालाही सुरुवात केली असल्याची प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

राज कुंद्राच्या अडचणी वाढणार

पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पॉर्नोग्राफीक व्हिडिओ रॅकेट केस मध्ये समावेश असणाऱ्या राज कुंद्राच्या चार कर्मचाऱ्यांनी त्याच्या विरोधात साक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज कुंद्रा सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. इतकंच नाही तर त्याची पत्नी शिल्पा शेट्टीला सुद्ध पोलिसांनी तपासा करीता बोलवल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर शिल्पाने पोलिसांना सांगितले माझा पती निर्दोष आहे. माझा पती राज कुंद्रा ज्या व्हिडिओसाठी काम करत होता ते व्हिडिओ एरोटिक व्हिडिओ होते. एरोटिक व्हिडिओ पॉर्न व्हिडिओ नसतात. शिल्पाच्या या वक्तव्यानंतर या प्रकरणी मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -