घरमनोरंजनहोमी भाभा-विक्रम साराभाई यांच्या महानतेवर आधारित वेब सिरीज 'रॉकेट बॉईज' प्रेक्षकांच्या भेटीला

होमी भाभा-विक्रम साराभाई यांच्या महानतेवर आधारित वेब सिरीज ‘रॉकेट बॉईज’ प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

इश्‍वाक सिंग विक्रम ए साराभाईची भूमिका साकारणार आहे, तर जिम सर्भ होमी जे भाभाची भूमिका साकारणार आहे. जिम सर्भ: ''सध्‍याच्‍या विलक्षण काळामध्‍ये विज्ञान, वैज्ञानिक संशोधन व नवोन्‍मेष्‍काराचे संबंध, शक्‍यतो जीवनदायी तंत्रज्ञान पूर्णत: आवश्‍यक बनले आहे.

सोनीलिव्‍हवर  सादर करण्‍यात येणारी सोनीलिव्‍हची आगामी ओरिजिनल ‘रॉकेट बॉईज’ भारताच्‍या उज्‍ज्‍वल न्‍यूक्लिअर भौतिकशास्‍त्रज्ञांच्‍या जीवनाला सादर करते. शो होमी भाभा व विक्रम साराभाई यांची कथा आणि महानता व इतिहासामधील त्‍यांच्‍या कामगिरीच्‍या त्‍यांच्‍या प्रवासाला दाखवणार आहे. या दोन महान विचारवंतांनी दूरदर्शी दृष्टिकोन सादर करण्‍यासोबत त्‍यांच्‍या स्‍वप्‍नांना सत्‍यात अवतरण्‍याचे शौर्य देखील दाखवले. त्‍यांनी सुरू केलेल्‍या मार्गामधून काही महान वैज्ञानिक शोध समोर आले. निखिल अडवानी, रॉय कपूर फिल्‍म्‍स आणि एम्‍मी एंटरटेन्‍मेंट निर्मित अभय पन्‍नू यांचे दिग्‍दर्शन आणि सिद्धार्थ रॉय कपूर, मोनिषा अडवानी, मधू भोजवानी, निखिल अडवानी यांची निर्मिती असलेला हा शो आपल्‍याला गतकाळात घेऊन जाईल आणि आजही प्रचलित असलेली त्‍यांची महानता व सर्वोत्तम कार्यांना समजण्‍यासाठी त्‍यांचे व्‍यक्तिमत्त्व व जीवनाला सादर करेल.

इश्‍वाक सिंग विक्रम ए साराभाईची भूमिका साकारणार आहे, तर जिम सर्भ होमी जे भाभाची भूमिका साकारणार आहे.
जिम सर्भ: ”सध्‍याच्‍या विलक्षण काळामध्‍ये विज्ञान, वैज्ञानिक संशोधन व नवोन्‍मेष्‍काराचे संबंध, शक्‍यतो जीवनदायी तंत्रज्ञान पूर्णत: आवश्‍यक बनले आहे. ‘रॉकेट बॉईज’ ही सिरीज भारतीय वैज्ञानिक इतिहासामधील प्रतिष्ठित व्‍यक्‍ती विक्रम साराभाई व होमी भाभा यांच्‍याबाबत आहे. मी आशा करतो की, त्‍यांच्‍या कथा भावी वैज्ञानिक, संशोधक व नवप्रवर्तकांच्‍या पिढीला प्रेरित करत राहतील. मी सोनीलिव्‍हवर ही सिरीज प्रसारित होताना पाहण्‍यास खूपच उत्‍सुक आहे.”
इश्‍वाक सिंग: ”विक्रम साराभाई सारखी वास्‍तविक जीवनातील व्‍यक्तिरेखा साकारण्‍याची वारंवार संधी मिळत नाही. मी कलाकार, तसेच भारतीय म्‍हणून या संकल्‍पनेकडे आकर्षून गेलो. त्‍यांनी प्रतिष्ठित वैज्ञानिक वारसामध्‍ये अभिमानास्‍पद कामगिरी केली आहे. ‘रॉकेट बॉईज’ ही निखिल अडवानीसोबत माझी दुसरी सिरीज आहे आणि टीमने या भूमिकेसाठी माझी निवड केल्‍याने मी त्‍यांचे आभार मानतो.”

- Advertisement -

हे हि वाचा  – IndianIdol 12:जेवढी जास्त चर्चा तेवढी TRP मध्ये वाढ, कुमार सानूची वादात एंट्री


 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -