Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन परदेशातून परतणाऱ्यांचे क्वारंटाइन टाळण्यासाठी हॉटेलवाल्यांकडून १० हजारांची मागणी, गायिकेचा आरोप

परदेशातून परतणाऱ्यांचे क्वारंटाइन टाळण्यासाठी हॉटेलवाल्यांकडून १० हजारांची मागणी, गायिकेचा आरोप

परदेशातून कोणताही नागरिक भारतात आल्यास त्याला काही दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाइन होणे बंधणकारक असणार आहे. पण मात्र या हॉटेल ला १० हजार देवून या क्वारंटाइनमधून सुटका होत असल्याचा आरोप एका गायिकेने केला आहे.

Related Story

- Advertisement -

कोरोनाचा वाढताा प्रादुर्भाव लक्षात घेता कडक निर्बंध लावण्यात आले. परदेशातून कोणताही नागरिक भारतात आल्यास त्याला काही दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाइन होणे बंधणकारक असणार आहे. पण मात्र या हॉटेल ला १० हजार देवून या क्वारंटाइनमधून सुटका होत असल्याचा आरोप एका गायिकेने केला आहे. गायिका पियू उदासी या गायिकेने २८ मार्चला सोशलमीडियाद्वारे एक व्हिडिओ पोस्ट करत यासंबंधी माहिती दिली होती. या व्हिडिओमध्ये ती अशी म्हणाली होती की, माझा भाऊ आफ्रिकेवरून परतल्यानंतर विमानतळावर त्याला थांबवून येथील नियमांनुसार क्वारंटाइन होणे बंधनकारक असल्याचे त्याला सांगण्यात आले. पण त्याने तेथील अधिकाऱ्यांना सांगितले की, त्याची दोन वेळा कोरोना चाचणी झाली असून रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र, असे असतानाही सात दिवस त्याला क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आले. या सात दिवसांत तुमची टेस्ट होणार नाही. केवळ तुम्हाला हॉटेलचं रूम भाडे, खाण्या-पिण्याचं आणि औषधांचं बिल भरावं लागेल असं देखील सांगण्यात आले. त्यामुळे या गोष्टीला माझ्या भावाने विरोध केला.

 त्यानंतर माझ्या भावाला एका पोलीस कर्मचाऱ्याने बाजूला नेलं आणि सांगितलं की, आम्ही येथून तुम्हाला हॉटेलमध्ये घेऊन जाणार आहोत. तुम्हाला तेथे क्वारंटाईन व्हायचं नसेल तर काय करायचं हे तिथे गेल्यावर हॉटलचे मॅनेजेंट तुम्हाला सांगेल… हॉटेलमध्ये गेल्यावर माझ्या भावाचे पासपोर्ट घेण्यात आले आणि माझ्या भावाला सांगण्यात आले की, दहा हजार रुपये भरल्यास तुम्हाला क्वारंटाईन व्हायची गरज नाहीये. पण माझ्या भावाने या गोष्टीसाठी नकार दिल्यावर त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला.

- Advertisement -

 यासंबंधी व्हि़डिओ अपलोड केल्यानंतर पियूवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करुन तिच्या भावावर एफआयआर दाखल करण्यात आली.


हे वाचा-  सूर नवा ध्यास नवा – आशा उद्याची कार्यक्रमाचा Grand Premiere लवकरच!

- Advertisement -