Maharashtra Assembly Election 2024
घरमनोरंजनHousefull 5: 'Housefull 5' सिनेमाचं शूटिंग शेवटच्या टप्यात

Housefull 5: ‘Housefull 5’ सिनेमाचं शूटिंग शेवटच्या टप्यात

Subscribe

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद नाडियादवाला सध्या ‘हाऊसफुल 5’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाबाबत रोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय कलाकार या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. ‘हाऊसफुल 5 या चित्रपटाच्या सेटवरील कलाकारांचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

नाडियादवाला ग्रॅन्डसन या एक्स पोस्टवरुन संपूर्ण हाऊसफुल 5 स्टार कास्टचा एक फोटो शेअर केला या फोटोत Housefull 5 मधील सर्व कलाकार एकत्र आले आहेत. यामध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख, श्रेयस तळपदे, संजय दत्त, अभिषेक बच्चन, जॅकी श्रॉफ, नर्गिस फाखरी, नाना पाटेकर, चंकी पांडे, जॉनी लिव्हर, डिनो मोरिया या लोकप्रिय कलाकारांची फौज आहे. फोटोला कॅप्शनमध्ये लिहिले, “आमच्या सिनेमाच्या प्रवासाच्या अंतिम शेड्यूलमधून जात आहे!”

- Advertisement -

साजिद नाडियादवालाचा हाऊसफुल 5 हा पाचवा टप्पा गाठणारी पहिली फ्रँचायझी आहे हे मनोरंजन, मजा आणि विनोदाने भरलेले आहे. लंडन ते फ्रान्स, स्पेन आणि ब्रिटन या आलिशान क्रूझवर चित्रित केलेला हा बिग बजेट चित्रपटांपैकी एक आहे. बहुचर्चित Housefull 5 हा सिनेमा 6 जून 2025 ला रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने वेलकमनंतर अक्षय कुमार आणि नाना पाटेकर अनेक वर्षांनी एकत्र येणार आहेत. याशिवाय बऱ्याच कालावधीनंतर नाना पाटेकर एका कॉमेडी सिनेमात दिसणार आहेत. अशाप्रकारे Housefull 5 ची उत्सुकता शिगेला आहे.


Edited By : Nikita Shinde

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -