घरमनोरंजनवाचा... लता मंगेशकर कशा बनल्या "भारतीय गानकोकिळा"

वाचा… लता मंगेशकर कशा बनल्या “भारतीय गानकोकिळा”

Subscribe

भारताची "गानकोकिळा" लता मंगेशकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी 6 फेब्रुवारी 2022 ला लता मंगेशकर यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. यावेळी त्यांच्या सर्व चाहत्यांना मोठा धक्का बसला.

लता मंगेशकर यांच्या आवाजाचा कोणी चाहता नसेल असे शोधूनही सापडणे अशक्य आहे. फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात लता मंगेशकर यांच्या आवाजाचे चाहते आहेत. लता दीदींनी हिंदी, मराठी गाण्यांसह तब्बल 36 वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायलेली आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून आजारी असलेल्या लता मंगेशकर यांनी अखेर 2022 मध्ये मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयात 6 फेब्रुवारीला अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने त्यांच्या जगभरातील चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

लता मंगेशकर या “स्वरलता” या नावाने सुद्धा ओळखल्या जातात. जगातील सर्वात प्रभावशाली गायकांमध्ये त्यांचे नाव प्रथम क्रमांकावर आहे. भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना “भारतीय गानकोकिळा” आणि “क्वीन ऑफ मेलडी” सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या आहेत. पण लता मंगेशकर यांचा हा गायनातील प्रवास वाटतो तितका सोपा नाहीये. लता मंगेशकर यांना सुद्धा त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला काही संगीतकारांनी नाकारले होते.

- Advertisement -

1942 मध्ये लता मंगेशकर यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले. त्यानंतर मंगेशकर कुटुंबियांचे आप्त आणि नवयुग कंपनीचे मालक मास्टर विनायक यांनी मंगेशकर कुटुंबाची जबाबदारी घेऊन काळजी घेतली. त्यांनीच लता दीदींना गायिका आणि अभिनेत्री म्हणून काम सुरु करण्यास मदत केली. १९४२ मध्येच लता दीदींनी ‘नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी’ हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या किती हंसाल या मराठी चित्रपटासाठी गायले, पण हे गाणे चित्रपटातून वगळण्यात आले.

मास्टर विनायक यांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदर यांनी लता मंगेशकर यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी लता दीदींची ओळख हिंदी चित्रपटसृष्टीचे तेव्हाचे निर्माते शशिधर मुखर्जींशी केली. पण मुखर्जींनी लताजींचा आवाज अतिशय बारीक आहे असे म्हणत नाकारला. तेव्हा हैदरांना राग अनावर झाला होता. तेव्हा मुखर्जींना उद्देशून हैदर म्हणाले होते की, “येणाऱ्या काळात निर्माते आणि दिग्दर्शक लताचे पाय धरतील आणि आपल्या चित्रपटांसाठी गाण्याची याचना करतील.” यानंतर गुलाम हैदर यांनी लतादीदींना मजबूर या 1948 मध्ये आलेल्या चित्रपटात “दिल मेरा तोडा” हे गाणे गाण्याची मोठी संधी दिली आणि लता मंगेशकर यांचा गायन क्षेत्रातील न थांबणारा प्रवास सुरू झाला.ट

- Advertisement -

हेही वाचा – नाशिकमध्ये साकारणार लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ हेल्थ सेंटर

लता मंगेशकर यांना देखील त्यांच्या संगीत क्षेत्रामध्ये नकार मिळाले होते. हिंदी चित्रपटसृष्टीचे सुप्रसिद्ध संगीतकार ओ.पी. नय्यर हे असे एकमेव अपवाद होते ज्यांनी आपल्या गाण्यांसाठी लता मंगेशकर यांच्या ऐवजी त्यांची लहान बहीण आशा भोसले यांना प्राधान्य दिले होते. पण लता मंगेशकर यांनी त्यांच्या गाण्याच्या शैलीने आणि आवाजाच्या जादूने संपूर्ण जगातील लोकांच्या मनावर राज्य केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -