घरमनोरंजनटोनी कक्करच्या गाण्यावर सोनू-नेहा कक्करने वेगळ्या अंदाजात दिली प्रतिक्रिया

टोनी कक्करच्या गाण्यावर सोनू-नेहा कक्करने वेगळ्या अंदाजात दिली प्रतिक्रिया

Subscribe

लोकप्रिय गायक टोनी कक्कर (Tony Kakkar)याचा नुकताच ‘साथ क्या निभाओगे’ हा म्युझिक व्हिडिओ रिलिज झाला आहे. यानिमित्त एका मुलाखती दरम्यान टोनी कक्करने आपल्या दोन्ही बहिणीं नेहा आणि सोनू त्याने गायलेल्या गाण्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असल्याचे सांगितले. टोनीने सावन आया है, खुदा भी, मिले हो तुम, मोहब्बत नशा है, कोका कोला तू, धीमे धी यासारखरी पॉप्युलर गाणी गायली आहेत.तसेच प्रत्येक गाणी हिट देखील ठरली आहेत. टोनीने IANS ला दिलेल्या मुलाखती दरम्यान त्याच्या दोघही बहिणीं कशा प्रकारे त्याच्या गाण्यावर रियाक्शन देतात याचा खुलासा केला आहे. टोनी म्हणाला जेव्हा सोनू कक्करला अभिप्राय देण्याची वेळ येते तेव्हा तिचा काहीसा वेगळा अंदाज असतो. ती दोन प्रकारे उत्तर देते, “हे गाण माझ्या प्लेलिस्टमध्ये आलं नाहिये किंवा मला जरा वेळ दे मी तुला उद्या सांगेन. हे गाणं व्यवसायिकरित्या ठिक आहे.”(how sister neha and sonu kakkar react to tony kakkar song)

 

View this post on Instagram

 

A post shared by Tony Kakkar (@tonykakkar)

- Advertisement -

तसेच नेहा तर माझ्या प्रत्येक गाण्यावर नाचू लागते, टाळ्या वाजवते. तिला माझी गाणी प्रचंड आवडतात. आम्हां तिघही भाऊ- बहिणींच्या आवडी-निवडी काहिश्या वेगळ्या आहेत.

मी आणि नेहाने अनेक गाणी एकत्र गायली आहेत.सध्या माझं आगामी गाण ‘साथ क्या निभाओगे’ हे 90 च्या दशकातील हिट गाणे आहे. मी या गाण्याला रीक्रिएट केलं आहे. तसेच हे गाण माझ्या आई वडिलांच्या काळातील असून मला आता पुन्हा एकदा आजच्या तरुणाई मध्ये हे गाण लोकप्रिय करायचं आहे. सध्या या काळात अनेक रिमेक गाणी तयार होत असल्याने सोशल मीडियावर अनेकदा टिकांचा सामना करावा लागतो यामुळे मला थोड्याप्रमाणात दबावासारखे वाटत आहे. पण फराह खानने हा म्युझिक व्हिडिओ दिग्दर्शित केला असल्यामुळे माझं थोड फार टेंन्शन कमी झालं आहे. त्यांनी उत्तमरित्या गाणं दिग्दर्शित केलं आहे.

- Advertisement -

हे हि वाचा –  अफगाणि पॉप स्टार अर्याना सईदने तालिबानच्या भीतीने सोडला देश

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -